हेमंत जाधव
मागील काही दिवसांपासून बांगला देशातील हिंदूं बांधवानवर अत्याचार होत आहेत, हिंदूंवर अत्याचाराच्या वेगवेगळ्या बातम्या येत आहेत, त्यामुळे भारतीय हिंदूंकडून ह्या कृत्याचा निषेध व्यक्त होत आहे. आज धनकुबेर संस्थान चे पिठाधिष देवी इंद्र महाराज यांनी माननीय राष्ट्रपती यांना माननीय उपविभागीय अधिकारी यांचे माध्यमातून निवेदन पाठवले आहेत. या निवेदनात देव इंद्र महाराज यांनी काही प्रमुख मागण्या केल्या आहेत.
१) बांगला देशाच्या माजी पंतप्रधान यांना देशातून काढून द्यावे जेणे करून तेथील हिंदूंवर अत्याचार होणार नाहीत…
२)बांगला देशातील हिंदू बांधवांना देशात आण्याची सरकारने व्यवस्था करावी…
३)बांगला देशातील 108 हिंदू बांधवांची अन्न, वस्त्र, निवारा व रोजगार ची जवाबदारी धनकुबेर संस्था स्वीकारण्यास कटिबध्द आहे. तरी भारताचे माननीय पंतप्रधान, राष्ट्रपती आणि रक्षमंत्री यांनी आमची मागणी मान्य करावी व खरा हिंदुवाद सिध्द करावा अशी विनंती ही निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली