रामटेक – राजु कापसे
मानवतेचे महान पुजारी गुरुमाऊली गुरुकुंज बिहारी वं राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची ११५ वी जयंती श्री गुरुदेव सेवा मंडळ नेरी च्या वतीने नाविन्यपूर्ण उपक्रमाने साजरी करण्यात आली श्री गुरुदेव सेवा मंडळ नेरी ने ही ग्रामजयंती दिनांक २४/४/२०२४ पासून ते ३०/४/२०२४ पर्यंत या ७ दिवसात नेरीतील प्रत्येक सहा वार्डातील सहाही मंदिरात सायंकाळची सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली.
यात प्रत्येक दिवशी या सामुदायिक प्रार्थनेच्या महत्त्वावर मान्यवरांचे चिंतन व मार्गदर्शन घेण्यात आले तसेच या ग्रामजयंतीची सांगता दिनांक ३०/४/२०२४ ला झाली यात या ग्रामजांतीच्या महत्त्वावर ह.भ.प. श्री कापसे महाराज यांचे प्रवचन व मार्गदर्शन घेण्यात आले.
त्यानंतर या ग्रामजयंती च्या निमित्ताने मा. डाँ. श्री. श्यामजी हटवादे साहेब मा. प्रा.श्री .चरडे सर, ग्रामगीताचार्य मा. प्रा.श्री राम राऊत सर, मा.श्री. सावरकर सर यांचे मार्गदर्शन सर्व गरुदेव प्रेमींना झाले या कार्यक्रमाचे संचालन श्री प्रमोदभाऊ पिसे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री रामेशभाऊ पिसे यांनी केले नंतर महाप्रसादाचा लाभ घेण्यात आला.
.या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष मा श्री दादारावजी पिसे गुरुजी उपाध्यक्ष श्री देवरावजी कडूकार सचिव श्री अशोकजी पंधरे बाबूसाहेब व्यवस्थापक श्री दिवाकरराव पिसे मा श्री कमलाकरराव लोणकर श्री इसनाजी भरडे श्री रवि चुटे श्री विलासभाऊ पिसे व इतर सर्व गुरुदेव प्रेमींचे बाल गोपाल महिला मंडळी यांचे खूप मोलाचे योगदान लाभले.