पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाची यशस्वी कामगीरी…
पातूर – निशांत गवई
पातुर तालुक्यातील ग्राम आगीखेड येथील गावात असलेल्या सार्वजनिक विहरीत आज सकाळी येथीलच रहिवासी राजेश शिवाजी कांबळे वय अंदाजे (44) वर्ष हे पडले असल्याची माहीती पातुर पोलीस ठाण्याचे पिआय कीशोर शेळके साहेब यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव प्रमुख दिपक सदाफळे यांना देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करिता पाचारण केले.
क्षणाचाही विलंब न करता पथकाचे प्रमुख दिपक आणी त्यांचे सहकारी मयुर सळेदार,सुरज ठाकुर,विष्णू केवट,शेखर केवट,अश्विन केवट, जितेंद्र केवट आणी शोध व बचाव साहीत्यासह पोहचुन 45 फुट खोल असलेल्या विहरीमधील मृतदेह शोधून बाहेर काढला.स्कुबा डायविंग ऑक्सिजन कीट लाऊन स्विमर आत मध्ये गेला आणी अंडरवर्ल्ड वाॅटर सर्च ऑपरेशन केले….
यावेळी पातुर पोलीस ठाण्याचे पिएसआय गजानन पोटे सर, हे.काॅ.राम आंबेकर साहेब, हे.काॅ.हीम्मत डीगोळे साहेब, हे.काॅ.अभिमन्यू आठवले साहेब,पो.काॅ.सचिन पिंगळे साहेब सरपंच गजानन टप्पे, आणी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहीती पथक प्रमुख दिपक सदाफळे यांनी दीली आहे.