Tuesday, December 31, 2024
HomeBreaking NewsBreaking | अफगाणिस्तान मध्ये प्रवासी विमान कोसळले...

Breaking | अफगाणिस्तान मध्ये प्रवासी विमान कोसळले…

Breaking : अफगाणिस्तानच्या बदख्शान प्रांतात रविवारी एक प्रवासी विमान कोसळल्याचे वृत्त आहे. सर्वप्रथम हे भारतीय विमान असल्याची माहिती मिळाली होती. पण ही माहिती चुकीचे असल्याचे डीजीसीएच्या अधिकाऱ्याने सांगितले या दुर्घटनेतील मृतांच्या संख्येबाबत सध्या कोणतीही माहिती मिळालेली नाही.

अफगाणिस्तानच्या माहिती मंत्रालयाच्या प्रमुखांनी सांगितले की, कुरान-मुंजन आणि जिबाक जिल्ह्यातील तोफखाना टेकड्यांमध्ये विमान कोसळले. या घटनेच्या तपासासाठी एक पथक पाठवण्यात आले आहे. स्थानिक लोकांचा दावा आहे की हे विमान रविवारी सकाळी कोसळले.

डीजीसीएच्या अधिकाऱ्याने ते भारतीय विमान नसल्याची पुष्टी केली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बदखशान प्रांतातील कुरान-मुंजन आणि झिबाक जिल्ह्यांसह तोफखाना पर्वतांमध्ये कोसळलेले विमान मोरक्कन नोंदणीकृत डीएफ 10 विमान होते.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: