Breaking News : राजस्थानमधील दौसा येथे भीषण अपघात घटना झाल्याची बातमी समोर आली आहे. दौसा जिल्हाधिकारी कार्यालय सर्कलजवळ बसचे नियंत्रण सुटून रेल्वे रुळावर पडून चार जणांचा मृत्यू झाला. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याचेही वृत्त आहे, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या अपघातात 24 जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर रेल्वे मार्गावरील गाड्यांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग-21 वर हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
राजस्थानमध्ये सोमवारी पहाटेचा दरम्यान हा अपघात झाला, ज्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, दौसाच्या कलेक्टर सर्कलजवळ हा अपघात झाला, जिथे बसचे नियंत्रण सुटून रेल्वे रुळावर पडले. बचावकार्य सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एडीएम दौसा राजकुमार कासवा यांनी सांगितले की, अपघातानंतर 28 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत.
#WATCH Rajasthan: Four people died, and several injured after a bus lost its control and fell on the railway track near Dausa Collectorate Circle. All the injured have been taken to the hospital. (05/11) pic.twitter.com/Xge5qLT9My
— ANI (@ANI) November 6, 2023