मुंबई शालिमार लोकमान्य टिळक एक्सप्रेसला अपघात झाला असल्याची घटना समोर आली असून सुदैवाने यामध्ये जीवित हानी झाली नसून ट्रेन दोन भागात विभागल्या गेली असल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे. आज सायंकाळी साडेपाच च्या सुमारास नागपूर जिल्ह्यातील कलमाना गावाजवळ हि घटना घडली असल्याचे समजते. तर या घटनेची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळताच आपत्कालीन पथक पोहचले असून रेल्वे रुळावरून खाली घसरले डब्बे पुन्हा रुळावर आणण्याचे काम सुरु केले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. लोकमान्य टिळक-शालिमार एक्स्प्रेसचे तीन डबे रुळावरून घसरले. सुभाषचंद्र बोस रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावरुन घसरली. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून निघालेली ही ट्रेन शालिमारकडे जात होती.
नागपूरवरून हावडाकडे जात असताना कलमाना गावाजवळ हा अपघात झाला असून सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नसून काही लोकांना इजा झाल्याचे समजते. आज संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली आहे. नागपूर पासून काही अंतरावर गेल्यानंतर शालिमार एक्सप्रेस मधील डब्यात ब्रेक तुटल्याने तीन डबे रुळावरून घसरले व इंजिन पासून वेगळे झाले. त्यामुळे ट्रेन दोन भागात विभागल्या गेली तर सुदैवाने चालकाच्या लक्षात ही बाब आल्यावर त्यांनी लगेच इमर्जन्सी ब्रेक केल्यानंतर सुदैवाने मोठा अनर्थ टळला.