Sunday, December 22, 2024
HomeBreaking NewsBreaking | गोरखनाथ मंदिर हल्ल्यातील आरोपी मुर्तझा अब्बासी याला NIA कोर्टाने सुनावली...

Breaking | गोरखनाथ मंदिर हल्ल्यातील आरोपी मुर्तझा अब्बासी याला NIA कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा…

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिर हल्ल्यातील आरोपी मुर्तझा अब्बासी याला एनआयए न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. रिपोर्टनुसार, 4 एप्रिल 2022 रोजी आरोपी मुर्तझा अब्बासीने मंदिरावर हल्ला केला होता. मुर्तझा अब्बासीने ISIS साठी लढण्याच्या उद्देशाने 2020 मध्ये शपथ घेतली होती.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या पीएसी जवानांनी त्याला अडवले असता बांके यांनाही जखमी केले. मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊ येथील एनआयए-एटीएस न्यायालयाचे विशेष न्यायाधीश विवेकानंद शरण त्रिपाठी यांनी सोमवारी ही शिक्षा सुनावली. मुर्तझा अब्बासी यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

मुर्तझा हा वादग्रस्त झाकिर नाईकचे व्हिडीओ बघायचा. तो गोरखपुर येथील सिविल लाईनचा रहिवाशी असून, त्याने मुंबई २०१५ साली आयआयटीमधून केमिकल इंजिनियरिंग पूर्ण केलं. त्यानंतर दोन मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीही केली होती. २०१७ पासून तो मानसिकरित्या ठिक नसल्याचं त्याच्या कुटुंबियांनी सांगितलयं. त्याच्यावर अनेकवेळा उपचार केले गेल्याचं देखील उघड झालंय.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: