Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीब्रेकिंग | गडचिरोली पोलिसांकडून अटक झालेल्या जहाल नक्षलवाद्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी...

ब्रेकिंग | गडचिरोली पोलिसांकडून अटक झालेल्या जहाल नक्षलवाद्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी…

गडचिरोली – टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने एका जहाल नक्षलवाद्यास गुरुवारी 23 फेब्रुवारी रोजी अटक केली. गोपनिय खबरीच्या आधारे विशेष अभियान पथकाच्या जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबवून जहाल नक्षली नामे वेल्ला केसे वेलादी, वय ३५ वर्षे, रा. येडापल्ली तह. भोपालपट्टनम्, जि. बीजापूर, (छत्तीसगड) यास अटक केली. तो सन २००१ पासुन जनमिलीशीया म्हणुन नक्षलचे काम करत होता. त्यानंतर सन २००६ पासुन दिलीप आणि मंगी (सँड्रा) दलममध्ये सदस्य या पदावर कार्यरत होता.

त्याचा माहे सप्टेंबर २०२१ मडवेली जंगल परिसरात झालेल्या पोलीस नक्षल चकमकीमध्ये सहभाग होता. तसेच त्याचा २३ डिसेंबर२०२२ रोजी मौजा टेकामेटा जंगल परिसरात झालेल्या पोलीस नक्षल चकमकीत सहभाग असून या चकमकी दरम्यान त्याने छत्तीसगड दलमचा डीव्हीसीएम भास्कर यास पळून जाण्यास मदत केली होती अशी माहीती चौकशी वरुन मिळाली.

त्याचा जाळपोळ, चकमक, दरोडा, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे इत्यादी गुन्ह्यामध्ये सहभाग असून, त्यास २०२१ साली मौजा मडवेली जंगल परिसरात झालेल्या चकमक या गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. त्याला मा. न्यायालयापूढे हजर केले असता, २८फेब्रुवारी२०२३ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली असून, पुढील तपास गडचिरोली पोलीस दल करीत आहे.

गडचिरोली पोलीस दलाने राबविलेल्या प्रभावी नक्षलविरोधी अभियानामुळे माहे जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकूण ६५ नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल , अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे ., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता,अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले असुन नक्षलवाद्यांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: