Monday, December 23, 2024
HomeBreaking NewsBreaking | ST बस आणि कारचा भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू...यवतमाळ ते...

Breaking | ST बस आणि कारचा भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू…यवतमाळ ते अमरावती मार्गावरील घटना…

यवतमाळ ते अमरावती मार्गावर बस आणि कारचा भीषण अपघात झाल्याची घटनेची प्राथमिक माहिती मिळाली असून या भीषण अपघात 4 जनाचा जागीच मृतू झाला आहे तर बस मधील 13 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. सदर घटना आज रविवारी 3.30 सुमारास घडली आहे.

सदर कार यवतमाळ कडून अमरावतीकडे जात होती, तर एसटी बस यवतमाळकडे जात होती. यवतमाळच्या नेरजवळील लोणी गावाजवळ कार आणि बसची भीषण धडक झाली.

या घटनेत राजेश इंगोले (यवतमाळ), रजनी इंगोले (यवतमाळ), वैष्णवी गावंडे (वाशिम) आणि सारीखा चौधरी (पुसद, यवतमाळ) या चौघांचा मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, कारमधील चौघे जागीच ठार झाले. बसमधील १३ जण गंभीर जखमी झाले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: