Sunday, December 22, 2024
HomeBreaking NewsBreaking | मुसळधार पावसाने रेल्वे ट्रॅक खालील जमीन गेली वाहून...मेमो ट्रेनचा अपघात...

Breaking | मुसळधार पावसाने रेल्वे ट्रॅक खालील जमीन गेली वाहून…मेमो ट्रेनचा अपघात टळला…मुंबई ते नागपुर रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प…

मूर्तिजापूर, नरेंद्र खवले

मध्यरेल्वेच्या मुंबई ते नागपूर रेल्वे मार्गावरील मूर्तिजापूर तालुक्यात येत असलेल्या माना स्टेशन पासून दोन किलो मिटर अंतरावर असलेल्या ठिकाणी रेल्वे रुळाखालील जमीन मुसळधार पावसामुळे वाहून गेल्याने उप-डाऊन दोन्ही कडील रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर पायलट प्रसंगावधानामुळे मेमो ट्रेनचा अपघात टळला…

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुर कडे जाणाऱ्या गाड्या भुसावळ डिव्हिजन मधील सर्व रेल्वे स्थानकावर थांबल्या असून तर मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या बडनेरा रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आल्या आहेत. तर आताच मिळालेल्या माहिती वर्धा भुसावळ पॅसेंजरला मुर्तीजापुर येथे येणार असून वर्धाकडील जाणाऱ्या पॅसेंजर ना पुढील प्रवास एसटीने करावा लागणार आहे.

तर या पॅसेंजर गाडीला भुसावळ रवाना करण्यात येईल. बाकी सर्व गाड्या रद्द करण्यात आला आहे. पाण्याचा फ्लो सुरू असल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांना अडथळे निर्माण होत आहे. रेल्वे मार्ग कधी पर्यंत सुरळीत होईल याची माहिती अजून मिळाली नाही.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: