लोकसभा निवडणुकीचा निकालानंतर गायब असलेले देवेंद्र फडणवीस आज अचानक प्रकटले यावेळी त्यांनी धक्कादायक निर्णय घेत राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. काल महाराष्ट्रात आलेल्या निकालाने भाजपच्या पायाखालची जमीन सरकली. पराभव कसा झाला याचे मंथन आज भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत केले. त्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी भाजपचा पराभव का झाला? त्याचे कारणे माध्यमांना सांगितली. मराठा आरक्षण, शेतीमालास भाव हे प्रश्न कळीचे मुद्दे ठरले. तसेच संविधान बदलणार असल्याचा जो प्रचार केला गेला, त्याचा फटका भाजपला बसला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आता लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज्य मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज्य मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नेता म्हणून महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाची सर्व जबाबदारी माझी आहे. पण मी हरणारा नाही, पण ताकदीने मैदानात उतरणार आहे. परंतु नेतृत्वाला माझी विनंती आहे, मला उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे आणि पक्षात काम करण्याची जबाबदारी द्यावी, असे धक्कादायक विधान देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना केले.
#WATCH | Mumbai: Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis says, "…This debacle that happened in Maharashtra, our seats have reduced, the entire responsibility for this is mine. I accept this responsibility and will try to fulfill whatever is lacking. I am not a person who will… pic.twitter.com/ypJzTTXHf4
— ANI (@ANI) June 5, 2024