अकोला – संतोषकुमार गवई
अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्तरावर आज 6 आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्यात एक रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले.
जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा पुरुष रुग्ण खडकी भागातील रहिवाशी असून, त्याचे वय 33 वर्षे आहे, तसेच तो सध्या गृह विलगीकरणात आहे.
यापूर्वी अकोला तालुक्यातील 75 वर्षीय पुरुष व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे आढळले असून, त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यानुसार सद्य:स्थितीत जिल्ह्यात दोन सक्रिय रुग्ण आहेत.
जिल्ह्यात 27 डिसेंबर 2023 ते 17 फेब्रुवारी 2024 दरम्यान 230 आरटीपीसीआर व 3 हजार 298 रॅपीड चाचण्या करण्यात आल्या.