पातुर – निशांत गवई
पातुर येथे स्थित असलेल्या मिलिंद नगर येथे शौर्य दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मिलिंद नगर बुद्ध विहार येथे भव्य स्टेज उभारण्यात आला व त्यावर भीमा कोरेगाव विजय स्तंभाजी प्रतिकृतीचे भव्य बॅनर लावून, एक जानेवारी अठराशे अठरा भीमा कोरेगाव येथे झालेल्या युद्धात ज्या 500 महार सैनिकांनी शौर्याची गाथा लिहिली त्या पाचशे शूरवीरांना मानवंदना देण्यात आली,
यावेळी रमाई बुद्ध विहार व बौद्ध समाज चॅरिटेबल ट्रस्ट, अध्यक्ष, अमोल बागडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच माजी सैनिक प्रमोद खंडारे, माजी सैनिक गणेश इंगळे, माजी सैनिक सुनील खिल्लारे, संदीप गवई,रुस्तम गवई, बळीराम खंडारे, अजय पोहरे, मनोहर खंडारे, धीरज पोहरे,
अक्षय पोहरे, अमित खंडारे, संतोष गवई, निशांत गवई, सिद्धार्थ गवई,व मिलिंद नवयुवक मंडळाचे सर्व सदस्य, विशाखा उपासिका संघ, व पातुर शहरातील बौद्ध बांधवांनी या शूर वीरांना सलामी देऊन मानवंदना देण्यात आली.