सांगली – ज्योती मोरे.
सध्या सुरू असलेल्या टाटा आयपीएल क्रिकेट सामन्यांच्या मॅचवर बेटिंग घेणाऱ्या सांगलीतील चार जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एकूण 2 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान आयपीएल क्रिकेट सामन्यांवर बेटिंग घेणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी नेमण्यात आलेल्या पथकास खास बातमीदारांना विश्वनाथ संजय खांडेकर. राहणार- गंगानगर रोड, वारणाली.
हा कुपवाड ते वाघमोडे नगरला जाणाऱ्या रस्त्यावरील कृष्णा मोरे यांच्या मालकीच्या शेतातील शेडमध्ये लखनऊ सुपर जायंटस आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघा दरम्यानच्या मॅचसाठी बेटिंग घेत असल्याची माहिती दिल्यानुसार सदर पथकाने या ठिकाणी छापा मारून विश्वनाथ संजय खांडेकर. वय वर्षे- 22,राहणार-गंगानगर रोड, वारणाली, रतन सिद्धू बनसोडे वय वर्षे सत्तावीस, राहणार आलिशान कॉलनी कुपवाड, गणेश मल्लाप्पा कोळी वर्षे 21, झेडपी कॉलनी वारणाली,संतोष सुरेश घाडगे वय वर्ष 19, राहणार महावीर नगर विश्रामबाग, या चौघांना ताब्यात घेतले आहे.
त्यांच्याकडून तीस हजारांचा एचपी कंपनीचा लॅपटॉप,दहा हजारांचा विवो कंपनीचा मोबाईल, दोन हजारांचा लावा कंपनीचा मोबाईल, दोन हजारांचा आयटेल कंपनीचा मोबाईल, दोन हजारांचा लावा कंपनीचा काळ्या रंगाचा मोबाईल,दोन हजारांचा लावा कंपनीचा पांढऱ्या रंगाचा मोबाईल, एक डायरी, एक बॉलपेन, दहा हजारांचा एक रेडमी कंपनीचा नोट नाईन मोबाईल, दहा हजारांचा रेडमी k20 pro मोबाइल ,दहा हजाराचा रेडमी नोट नाईन प्रो मोबाईल, पन्नास हजारांची हिरो एक्टिवा मोटरसायकल,
पन्नास हजारांची करड्या रंगाची सुझुकी एक्सेस मोटरसायकल, 50 हजारांची करड्या रंगाची होंडा एक्टिवा थ्रीजी मोटरसायकल,50 हजारांची एक करड्या रंगाची हिरो पॅशन प्रो मोटरसायकल, असा एकूण 2 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात मुंबई जुगार अधिनियम कलम चार आणि पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय.
इतर संशयितांचाही शोध सुरू आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे,दीपक गायकवाड, प्रशांत माळी,संदीप पाटील, सुनील चौधरी, सुधीर गोरे,अमोल ऐदाळे, राहुल जाधव, गौतम कांबळे, अजय बेंद्रे, आर्यन देशिंगकर,कॅप्टन गुंडवाडे, संजय कांबळे, संकेत मगदूम, आदींनी केली.