Monday, December 23, 2024
Homeराजकीयब्रह्म महाशिखर परिषद महाराष्ट्र संपर्क प्रमुख पदी ओमकार शुक्ल...

ब्रह्म महाशिखर परिषद महाराष्ट्र संपर्क प्रमुख पदी ओमकार शुक्ल…

सांगली – ज्योती मोरे

मिरजेतील कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि भाजप सांस्कृतिक प्रकोष्ट चे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष ओमकार शुक्ल यांची ब्रह्म महा शिखर परिषद महाराष्ट्र प्रदेश संघटक आणि संपर्कप्रमुख पदी निवड करण्यात आली. ब्रह्म महाशिखर परिषद ही संपूर्ण महाराष्ट्रातील ब्राह्मण संघटनांचे नेतृत्व करणारी शिखर संघटना आहे.

दोन वर्षांपूर्वी त्यांची या परिषदेवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पश्चिम महाराष्ट्रातून ओमकार शुक्ल हे एकमेव प्रतिनिधित्व करणारे सदस्य आहेत.
काल नाशिक येथील सिंहगड या शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत ही त्यांची निवड करण्यात आली.

पुढील काळात महाराष्ट्रातील सर्व ब्राह्मण समाजासाठी झटणारे नेते उद्योजक कार्यकर्ते यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करू असे प्रतिपादन त्यांनी यावेळेस बोलताना केले. परिषदेचे नूतन अध्यक्ष श्री सुरेश जी पुराणिक, मावळते अध्यक्ष सुरेश मुळे, संस्थापक अध्यक्ष श्री निखिल लातूरकर, श्री गजानन जोशी, श्री बाळासाहेब ठिगळे, श्री निलेश कुलकर्णी, श्री अमोल पुजारी,श्री मकरंद देशपांडे श्री गुरुप्रसाद रिसबूड उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: