नांदेड – महेंद्र गायकवाड
बिलोली तालुक्यातील मौजे भोसी येथील मुलगा सन 2018 मध्ये रागाच्या भरात घर सोडून निघून गेला होता त्या मुलास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने शोधून काढले असून मुलाला वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
बिलोली पोलीस ठाणे हद्यीतील मौ. भोसी येथील फिर्यादी नागनाथ ज्ञानोबा पेदे वय ४२ वर्ष यांनी पोस्टे बिलोली येथे दि. २६/०३/२०१८ रोजी फिर्याद दिली कि, त्यांचा मूलगा ज्ञानेश्वर नागनाथ पेदे वय १५ वर्ष हा घरून शाळेत जातो म्हणून जात होता पण तो शाळेत न जाता शाळेत गैरहजर राहत असल्याबाबत माहिती मिळाल्याने मी त्यास घेऊन दि. १६/०३/२०१८ रोजी शाळेत जाऊन विचारपूस करत असतांना मूलगा ज्ञानेश्वर हा शाळेच्या पाठीमागील भिंतीकडे गेला पंरतु तो परत न आल्याने त्याचा शोध घेतला पंरतु तो मिळुन आला नाही.
त्त्यास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळून नेले असावे, त्याचा शोध व्हावा म्हणुन दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे बिलोली गुरनं. ७०/२०१८ कलम ३६३ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास पोस्ट बिलोली येथे सन २०२१ पर्यंत करण्यात आला. त्यानंतर सदरचा गून्हा पुढील तपासकामी अनैतीक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथे वर्ग करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, अप्पर पोलीस अधीक्षक (भोकर) विजय कबाडे, पोलीस उप अधीक्षक (गृह) तथा प्रभारी अधिकारी अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, डॉ. अश्विनी जगताप, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, व्दारकादास चिखलीकर यांचे अधिपत्याखाली महिला पोलीस उप निरीक्षक प्रियंका आघाव, तसेच पोलीस हवलदार मारोती माने, अच्युत मोरे तसेच मपोना शितल सोळंके यांनी सदर गुन्हयाच्या तपासाच्या संबधाने माहिती घेतली असता,
तपासादरम्यान एक संशयास्पद मोबाईल नंबर मिळाला त्या नंबरचा सायबर सेलच्या मदतीने लोकेशन घेऊन पोलीस उप निरीक्षक, प्रियंका आघाव, मारोती माने यांनी त्यानंबरवर संपर्क साधला असता सुरुवातीस सदर मुलगा उडवा उडवीचे उत्तरे देऊन स्वतःचे नाव सांगत नव्हता परंतु त्यास विश्वासात घेऊन कौशल्यपूर्ण संभाषन केल्यानंतर त्याने मी ज्ञानेश्वर पैदे असुन मी औरंगाबाद येथे आहे असे खात्रीपूर्वक सांगीतल्याने पिडीत मुलास ताब्यात घेवून त्यांचे वडिलांचे स्वाधीन केले आहे.
अनैतीक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने मागील दिड वर्षात अपहृत व हरवलेले १३ बालके त्यात ०८ मुले व ०५ मुली यांचा शोध घेऊन त्यांचे पालकांचे स्वाधीन केले आहे. पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी नागरिकांना आवाहन केले कि, शहरात संशयास्पदरित्या व बेवारस लहान मुले, मुली फिरताना मिळून आल्यास पोलीस विभागाशी संपर्क साधावा.