Sunday, December 22, 2024
Homeराज्यदोन गटात झालेल्या क्षुल्लक वादातील आरोपीतांना बोरगाव मंजु पोलीसांनी केली वेळीच अटक,...

दोन गटात झालेल्या क्षुल्लक वादातील आरोपीतांना बोरगाव मंजु पोलीसांनी केली वेळीच अटक, कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे केले आवाहन…

अकोला – संतोषकुमार गवई

दि. २७.०५.२०२४ रोजी रात्री २०.०० वाजताचे सुमारास बोरगाव मंजु येथील मुस्लीम समाजाचे दोन लोक धनगरपुरा वस्ती मधुन बैल घेवून जात असतांना तेथील दोन हींदु धर्मीयांचे लोकांनी त्यांना बैल चोरीचे आहेत काय ? असे विचारले असता त्यांचे मध्ये किरकोळ वाद झाला.

सदर वादाचे पर्यावसान भांडणात झाले. त्यावेळी मुस्लीम समाजाचे जवळपास १५ लोक व हिंदु समाजाचे जवळपास १५ लोक यांनी एकत्र येवून गैरकायद्याची मंडळी जमवुन एकमेकांना लोखंडी पाईप व लाकडी काठ्यांनी मारहाण केली व एकमेकांवर दगडफेक केली. त्यामध्ये दोन्ही समाजाचे लोक जखमी झाले.

हिंदु समाजातील इसम नामे श्रीकांत उर्फ अनिकेत राजेंद्र गवळी रा. धनगरपूरा बोरगाव मंजु यांचे रिपोर्ट वरून आरोपी नामे – १. मोहम्मद अयफास मो. अफसर, २. शेख जुबेर शेख मुन्शी, ३. शेख सददाम उर्फ सज्जु शेख गणी, ४. शेख इमरान मुस्तफा कुरेशी व मुस्लीम समाजाचे १० ते १२ लोकांवर अपराध क्रमांक २७८/२०२४ कलम ३२४, १४३, १४७, १४८, १४९ भादंवि सहकलम १३५ महा. पोलीस अधि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच मुस्लीम समाजातील इसम नामे – शेख जुबेर शेख मुन्शी रा. कसाबपुरा बोरगाव मंजु यांचे रिपोर्ट वरून आरोपी नामे १. अनिकेत राजेंद्र गवळी, २. योगेश भाउराव मोरे, ३. केशव साहेबराव मोरे, ४. साहेबराव नारायण मोरे व हिंदु समाजाचे १० ते १२ लोकांवर अपराध क्रमांक २७९/२०२४ कलम ३२४, १४३, १४७, १४८, १४९ भादंवि सहकलम १३५ महा. पोलीस अधि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर घटनेची माहीती मिळताच पोलीसांनी आवश्यक द उपलब्ध पोलीस स्टाफ सह घटनास्थळावर जावून घटनेमध्ये जखमी झालेल्या इसमांना उपचाराकरीता अकोला पाठविले व परीस्थिती नियंत्रणात आणली. दोन्ही गुन्हयातील हिंदु समाजाचं १. अनिकेत राजेंद्र गवळी, २. योगेश भाउराव मोरे, ३. केशव साहेबराव मोरे,

४. साहेबराव नारायण मोरे सर्व रा. धनगरपुरा बोरगाव मंजु यांना व मुस्लीम समाजाचे १. मोहम्मद अयफास मो. अफसर, २. शेख जुबेर शेख मुन्शी, ३. शेख सददाम उर्फ सज्जु शेख गणी, ४. शेख इमरान मुस्तफा कुरेशी सर्व रा. कसाबपुरा बोरगाव मंजु यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे. दोन्ही गुन्हयातील इतर आरोपीतांना निष्पन्न करून त्यांना लवकरच अटक करण्यात येते.

घटनास्थळी पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुर्तिजापूर श्री. मनोहर दाभाडे यांनी भेट दिली असुन नागरीकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे, तसेच कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये याबाबत सांगण्यात आले आहे, सध्या बोरगाव मंजू येथील परीस्थिती नियंत्रणात आहे.

Santoshkumar Gawai
Santoshkumar Gawaihttp://mahavoicenews.com
मी संतोषकुमार गवई पत्रकारितेच्या क्षेत्रात गेल्या ३२वर्षापासून कार्यरत आहे.सकारात्मक विचार मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतो म्हणून no negative only & only positive news यावरच माझा विश्वास आहे.संपुर्ण देशात सर्वप्रथम कारगील युध्दाचा 'आँखो देखा हाल'मांडता आला. शोध पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील चांगल्या घटना घडामोडी 'महाव्हाईस 'डिजिटल माध्यमातून समाजासमोर मांडणे हे माझ ध्येय आहे... संतोषकुमार गवई अकोला- 9689142973/9860699890
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: