रामटेक – राजू कापसे
२३/०१/२०२४ रोजी रामटेक मध्ये खिंडसी जलाशयात नौका स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. निमित्त होते महासांस्कृतिक महोत्सव वर्ष २०२४ चे. नेहरू मैदान येथे विविध सांस्कृतिक महोत्सव दिनांक १९ ते २३ जानेवारी दरम्यान घेतांना विविध स्पर्धेचे देखील आयोजन प्रशासानाद्वारे केल्या गेले होते ज्यात, स्केटिंग, रांगोळी,मेहंदी,चित्रकला इत्यादींचा समावेश होता. याच पैकी नौका स्पर्धा नेत्राचे पारडे फिरवणारी ठरली.
स्पर्धेत ३२ नाव सहभागी झाल्या होत्या. प्रत्येक नाव दोन व्यक्तिंद्वारे वलव्हवण्यात आली. अंतर तेराशे मीटर निश्चित केले होते. प्रत्येक नाव वर प्रशासनाच्या वतीने मतदान जागृती विषयी चे बॅनर लावले लावण्यात आले होते. पहिल्या पाच विजेत्यांना दहा हजार, सात हजार, पाच हजार, तीन हजार, दोन हजार अशी अनुक्रमे पाच बक्षीस देण्यात आली. उर्वरित स्पर्धकांना प्रोत्साहन म्हणून स्टील डब्बे देण्यात आले. सर्वांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
मा. उपविभागीय अधिकारी श्रीमती सवरंगपते यांनी मतदान हक्क विषयी याप्रसंगी महत्त्व पटवून दिले. मा. तहसीलदार श्रीमती मोहने यांनी ही प्रक्रिया किती पारदर्शक पने राबविण्यात येते याविषयी मार्गदर्शन केले. मा. मुख्याधिकारी श्रीमती राऊत यांनी उत्तम उमेदवार निवडून दिलेत तर प्रशासनाला कशी मदत होते यावर भाष्य केले.
मा. शाखा व्यवस्थापक , स्टेट बँक ऑफ इंडिया श्री मिश्रा यांनी बँकेचे महत्त्व पटवून देतांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. पोलिस निरीक्षक श्री यादव आणि बी डी ओ श्री जाधव सुद्धा उपस्थित होते.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सृष्टी सौंदर्य बहुउद्देशिय संस्थेच्या श्री तिबुडे, श्री नारनवरे, डॉ. बापू सेलोकर चेरी फॉर्म चे श्री अमोल खंते, श्री संदेश,फिशरमन सोसायटी चे श्री उमाशंकर बागडे आणि श्री धर्मेश नागपुरे यांनी अथक परिश्रम घेतले.