Monday, December 23, 2024
HomeAutoबीएमडब्ल्यू मोटोर्राडने ठाणे मोटोर्राडची नवीन डीलर पार्टनर म्हणून नियुक्त केली...

बीएमडब्ल्यू मोटोर्राडने ठाणे मोटोर्राडची नवीन डीलर पार्टनर म्हणून नियुक्त केली…

न्युज डेस्क – ठाणे मोटोर्राडची ठाणे, महाराष्ट्रातील नवीन बीएमडब्ल्यू मोटोर्राड डीलर पार्टनर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे शोरूम कॉसमॉस ज्वेल्स, शॉप क्र. १, तळमजला, घोडबंदर रोड, आनंद नगर, ठाणे, महाराष्ट्र ४०००६१५ येथे स्थित आहे आणि समर्पित वर्कशॉप युनिट क्र. २/ए, ग्राउंड फ्लोअर, कोठारी कंपाउंड, मानपाडा रोड, ठाणे वेस्ट, ठाणे, महाराष्ट्र ४००६०७ येथे आहे. श्री जयराज मुराजमाल भागचंदानी हे ठाणे डिलरशिपचे प्रमुख आहेत.

बीएमडल्यू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष श्री. विक्रम पावाह म्हणाले. “बीएमडब्ल्यू मोटोर्राड आपल्या उल्लेखनीय उत्पादनांसह, तसेच रिटेल नेटवर्कमधील त्यांच्या सर्व्हिससह देखील आपले वचन ‘मेक लाइफ ए राइड’ कायम राखत आहे. प्रिमिअम विभागामध्ये प्रबळ डीलर नेटवर्क स्थापित करण्यासोबत आम्ही प्रमुख बाजारपेठांमधील आमची उपस्थिती दृढ करत आहोत. आम्हाला आमचे नवीन भागीदार ठाणे मोटोर्राडसोबत ठाण्यामध्ये अत्याधुनिक बीएमडब्ल्यू मोटोर्राड डिलरशिप नियुक्त करण्याचा आनंद होत आहे. हे नवीन केंद्र ठाणेमधील आमची पोहोच वाढवण्यामध्ये सहाय्यक भूमिका बजावेल आणि वैयक्तिकृत, भावनिक व प्रिमिअम ब्रँड अनुभव देईल.”

ठाणे मोटोर्राडचे डीलर प्रिंसिपल, श्री. जयराज मुराजमाल भागचंदानी म्हणाले, “आम्हाला ठाणेमध्ये ‘अल्टिमेट रायडिंग मशीन’ सादर करण्याचा आनंद होत आहे आणि बीएमडब्ल्यू मोटोर्राडसाठी डीलर पार्टनर म्हणून आम्हाला आमच्या व्यवसाय यशामध्ये बीएमडल्यू मोटोर्राड योगदान देणा-या भव्य क्षमतेबाबत उत्सुकता आहे. आम्ही बीएमडब्ल्यू मोटोर्राडसोबत सहयोगाने भारतातील प्रिमिअम मोटरसायकल विभागातील उल्लेखनीय प्रवास सुरु करण्यास उत्सुक आहोत. रायडिंग प्रेमींना अद्वितीय सेल्स, आफ्टरसेल्स अनुभव देण्यासोबत आमचे प्रबळ रायडिंग समुदाय निर्माण करण्यावर आणि रायडिंगप्रति प्रेमाला साजरे करण्यावर लक्ष केंद्रित असेल.”

हे शोरूम २,८०० स्केवर फूटवर पसरलेले आहे आणि ११ मोटोरसायकल्स, कस्टमर लाउंज आणि बीएमडब्ल्यू मोटोराड ऍक्सेसरीज व लाइफस्टाइल मर्चंडाइजची व्यापक श्रेणी दाखवतो. ४,००० स्केवर फूट समर्पित आफ्टरसेल्स सुविधेमध्ये परिपूर्ण वाहन सेवेसाठी ५ मेकॅनिकल बेज आहेत. ठाणे मोटोर्राड ग्राहकांना दर्जात्मक विक्रीपूर्व व विक्रीनंतर मालकीहक्क अनुभव मिळण्याच्या खात्रीसाठी सर्व प्रक्रियांमध्ये सेल्स, सर्व्हिस, स्पेअर पार्टस, व बिझनेस सिस्टीमचे आंतरराष्ट्रीय मानक देते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: