Sunday, December 22, 2024
Homeराजकीयशिवसैनिकाचे रक्ताने शपथ पत्र...

शिवसैनिकाचे रक्ताने शपथ पत्र…

हेमंत जाधव

काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत मोठी बंडाळी झाली आणि अनेक आमदार खासदार यांनी शिवसेनेला जयमहाराष्ट्र ठोकून महाविकास आघाडीतून वेगळे निघून भाजपा सोबत सत्ता स्थापन केली. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला इतकेच नव्हे तर या गोष्ठीची सर्वत्र चर्चा रंगली होती पण आजही काही बाळकडू प्यालेले शिवसैनिक उद्धव ठाकरे यांचे सोबत ठाम आहे. आज खामगाव येथील कट्टर शिवसैनिक श्रीराम राजाराम खेलदार यांचा वाढदिवस आहे त्यांनी आज वाढदिवसानिमित्य रक्ताने शपथ पत्र लिहले आहे.

या पत्रात त्यांनी स्वतःच्या रक्ताने “जय महाराष्ट्र हे दिवस निघून जातीलच मरे पर्यंत उद्धव साहेबांसोबत निष्ठा ठाकरे च्या मातोश्री सोबत गद्दार होणार नाही शिवसैनिक श्रीराम राजाराम खेलदार” असे नमूद केले आहे यावेळी त्यांचे सोबत शंकर खराडे, संतोष करे, संतोष सावंग, डॉ संतोष तायडे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.त्यांनी हे पत्र शिवसेना जिल्हाप्रमुख श्री भोजने यांचे कडे दिले आहे हे पत्र शिवसेना भवन येथे पोहचवणार असे खेलदार यांनी सांगितले

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: