रामटेक – राजू कापसे
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर २०२२ला “ब्लड फॉर बाबासाहेब” या अभियानांतर्गत संपूर्ण जगभरात रक्तदान शिबीर आयोजित करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले होते. यावेळी रामटेक येथे व्यापक स्तरावर १५७ व्यक्तींनी रक्तदान करून बाबासाहेबांना अभिवादन केले होते.
ब्लड फॉर बाबासाहेब तर्फे या शिबीर आयोजकांसाठी नुकतेच दोन दिवसीय चर्चासत्र व सत्कार समारंभ नागपूर येथे घेण्यात आले. या पार्श्वभूमीवर १२ जूनला दीप हॉटेल रामटेक येथे ६ डिसेंबर २०२३ ला आयोजित शिबीराबाबद विचार विनिमय करण्यासाठी बीएफबी रामटेक तालुक्याची बैठक घेण्यात आली.
रामटेक येथील शिबिराच्या यशस्वितेसाठी रीआन हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉ. प्रदीप बोरकर व डॉ. वैशाली बोरकर यांनी मोलाचे योगदान दिले होते. मागील अनेक वर्षांपासून बोरकर दाम्पत्य रामटेक परिसरातील गोरगरीब जनतेला अतिशय कमी शुल्क घेऊन उत्तम आरोग्य सेवा प्रदान करीत असल्याने ब्लड फॉर बाबासाहेब तर्फे त्यांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी साक्षोधन कडबे, महादेव सरभाऊ, ॲड. प्रफुल्ल अंबादे, अनिल वाघमारे, जगदीश सांगोडे, नितीन भैसारे, मनीष खोब्रागडे, शैलेश वाढई, सुमेध गजभिये, शंकर आहाके हे प्रामुख्याने उपस्थित होते.