Friday, September 20, 2024
Homeराज्यमेरी माटी मेरा देश या अंतर्गत स्वतंत्र अमृत महोत्सव १५ ऑगस्ट रोजी...

मेरी माटी मेरा देश या अंतर्गत स्वतंत्र अमृत महोत्सव १५ ऑगस्ट रोजी उरळ पोलीस स्टेशन येथे अकोला जिल्हा पोलीस दलातर्फे निंबा फाटा येथे भव्य रक्तदान शिबिरात ६४ रक्तदान दात्यांनी रक्तदान केले…

अकोला – अमोल साबळे

मेरी माटी मेरा देश या अंतर्गत स्वातंत्र्य अमृत महोत्सव १५ ऑगस्ट रोजी उरळ पोलीस स्टेशन येथे अकोला जिल्हा पोलीस दलातर्फे निंबा फाटा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

यावेळी जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालय अकोला येथील टीम कडून एकून ६४ रक्तदान दात्यांनी संकलित करण्यात आले. परिसरातील ६४ रक्तदान दातांनी रक्तदान केले तसेच उरळ पोलीस स्टेशन हद्दीमधील देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना देश सेवेसाठी शहीद झालेले शहीद सुमेध गवई यांची लोणाग्रा येथील वीर माता व वीर पिता यांचा सत्कार उरळ पोलीस स्टेशन मार्फत शिवसेनेचे जिल्हा संघटन उमेशभाऊ जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तसेच कारगिल युद्धामध्ये प्रत्यक्ष युद्धात सहभाग घेऊन कारगिल माजी सैनिक उमेश उबाळे यांचा सत्कार उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री गोपाल ढोले साहेबांनी केला. याप्रसंगी शिवसेनेचे नेते उमेशभाऊ जाधव तसेच पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री गोपाल ढोले साहेब व बाळापुर तालुका भाजपाचे तालुका अध्यक्ष अमोल साबळे यांनी यावेळेस परिसरातील उपस्थित असलेले सरपंच व पोलीस पाटील तसेच याप्रसंगी निंबा फाटा परिसरातील आधी विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: