सांगली – ज्योती मोरे
सांगली जिल्हा पोलीस दल संचलित वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने 34व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्ताने आज सकाळी विश्रामबाग मधील वाहतूक नियंत्रण शाखेत रक्तदान शिबिराचा आयोजन करण्यात आला होतं. दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक कलाप्पा पुजारी, भारतीय हॉस्पिटलच्या जनसंपर्क अधिकारी धनंजय भिसे यांच्या उपस्थितीत शिबिराला सुरुवात करण्यात आली. एकूण 50 बॅग रक्त संकलन करणार असल्याची माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना दिली.