चोखाळा येथे भागवत कथेची सांगता…
रामटेक – राजु कापसे
रामटेक तालुक्यातील चोखाळा येथे ह भ प कैलासराव वाघाये महाराज यांचा सुमधुर वाणीतून सुरू असलेल्या सात दिवसीय भागवत कथेची सांगता हनुमान मंदिर चोखाळा येथे झाली. भागवत कथेचे निमित्याने रेनबो रक्तपेटी द्वारे गावकऱ्यांचा वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले.यात 40 रक्तदानकर्त्यानी रक्तदान केले.
भागवत कथेला रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांनी दहीहंडी फोडून भागवत कथेची सांगता केली.नंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. भागवत कथेला माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी,पंचायत समिती रामटेक चे सभापती नरेंद्र बंधाटे,रामटेक तालुका भाजपा अध्यक्ष राहुल किरपान,भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष धर्मेंद्र शुक्ला,
रामटेक विधानसभा शोशल मीडिया संयोजक नंदकिशोर कोहळे,हनुमान मंदिर पंचकमिटी चोखाळा चे अध्यक्ष दूधराम हटवार,आदिनाथ हटवार,राजू किरपान,चंदू हटवार,मदन हटवार,वसंता किरपाण ताराचंद हटवार,अंकुश किरपान,संदीप वैरागडे,सागर पिसे,विक्की पडोळे,अनिकेत हटवार सहित गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित हो.