दानापूर – गोपाल विरघट
दानापूर येथिल सर्व नवदुर्गा उत्सव मंडळ ,समस्त दानापूर गावकरी, सर्व सामजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान दिनाचे औचित्य साधत भव्य रक्तदान शिबीर नुकतेच संपन्न झाले. यावेळी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते नवदुर्गा पूजन करून रक्तदान शिबीर सुरू करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ, सपना वाकोडे ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे आमदार प्रकाश भारसाकडे, रितू खोकर, मॅडम सह्यायक पोलीस अधिकारी अकोट , विजय चव्हाण , ठाणेदार हिवरखेड, श्री ,गजानन काकड ,जिल्हा परिषद सदस्य , संदीप पालिवाल ,पंचायत समिती सदस्य, अंकुश मानकर ,पटवारी , अकोला येथिल शासकीय रक्तपेढी चे डॉ, सुनिल जोशी, आरोग्य वर्धिनी केंद्राच्या डॉ, काळे मॅडम शिव व्याख्येते सौरव वाघोडे,
श्री ,राजाभाऊ उंबरकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष, संतोष माकोडे ,पोलीस पाटील , डॉ ,राजाराम खोडे, व डॉ, उद्धवराव विखे, डॉ ,रामराव मिसाळ, डॉ, वासुदेव शर्मा, डॉ ,आशिष हागे , मेडिकल असोसिएशन , सर्व नवदुर्गा उत्सव मंडळाचे कार्यकर्ते, गावातील नागरिक यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबीर संपन्न झाले.
यावेळी एकूण 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सोबतच मान्यवरांनी रक्तदान शिबीर , व रक्तदान करणे हे किती महत्वपूर्ण आहे हे रक्तदात्यांना समजावून सांगत,त्यांनी दिलेल्या या योदनाबद्दल सर्व रक्तदात्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड, अजितसिंग सेंगर यांनी केले तर आभार सुनीलकुमार धुरडे यांनी मानले.