दानापूर – गोपाल विरघट
सध्या सर्वत्र गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. दानापूर येथील रामदेव बाबा गणेशोत्सव मंडळाने सामाजिक हित जोपासत डॉक्टर असोसिएशन आणि महिला बचत गट गावकरी मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने भवानी मातेच्या मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन 26 सप्टेंबर 2023 ला करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ. सपनाताई धम्मपाल वाकोडे तर उद्घाटक अकोट मतदार संघाचे आमदार प्रकाश भारसाकळे प्रमुख अतिथी म्हणून हिवरखेड पोलीस ठाण्याचे ठाणेदार जी. एस.पांडव नायब तहसीलदार ढगे साहेब होते.
वैद्यकीय अधिकारी काळे मॅडम. तलाठी अंकुश मानकर ग्रा. पं. सदस्य गोपाल विखे डॉक्टर असोशियनचे उद्धवराव विखे, प्रमोद विखे, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष कैलास रोंदळे, प्रकाश विखे, गोपाल माकोडे, पोलीस पाटील संतोष माकोडे, तंटामुक्ती अध्यक्ष बळीराम बावणे, साहेबराव वाकोडे, बंडू पाटील ठाकरे, पत्रकार प्रमोद हागे,
प्रेमकुमार गोयणका, इत्यादी पाहुणे मंचकावर उपस्थित होते या रक्तदान शिबिरात, रक्त संकलनाकरता जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला ची टीम आली होती. या शिबिरात 36 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिरात प्राण पणाला लावून सीमेचे संरक्षण करणाऱ्या मोहन हागे.
या सैनिकाने रक्तदान करून आपले कर्तव्य पार पाडले मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. रामदेवबाबा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष स्वप्निल महाले, अमोल वाघ व मंडळाच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार सचिन ठोंबरे सर यांनी मानले या कार्यक्रमाला गावातील नागरिक महिला बचत गट अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.