Sunday, December 22, 2024
Homeराजकीयभाजपच्या वतीने सेवा पंधरवाडा अंतर्गत रक्तदान शिबिर व रुग्णांना फळ वाटप...

भाजपच्या वतीने सेवा पंधरवाडा अंतर्गत रक्तदान शिबिर व रुग्णांना फळ वाटप…

खामगाव – हेमंत जाधव

खामगाव :- देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा सप्ताह संपूर्ण भारतात राबविल्या जात आहे. खामगावात भाजयुमो, विद्यार्थी आघाडी, भाजप खामगाव शहर च्या वतीने उपजिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान शिबिर व रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम पार पडला.

या सप्ताह अंतर्गतभाजपच्या वतीने खामगाव मतदारसंघात विविध विकास कामांची भूमिपूजने, उद्घाटन, वृक्षारोपण, विविध लोकं उपयोगी सामाजिक कामे करण्यात येत आहेत. यांतर्गत आज खामगाव मतदारसंघाचे आमदार अँड. आकाश फुंडकर यांचे नेतृत्वात व महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया सहसंयोजक सागरदादा फुंडकर यांचे उपस्थित उपजिल्हा रुग्णालय खामगाव येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. तसेच रुग्णालयातील रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले.

या रक्तदान शिबिरात सागर काळजाते, संतोष तायडे, प्रदीप टकले , अंकुश खोंड, प्रवीण डोलतडे, नंदकिशोर मारके, विवेक शर्मा, प्रवीण कात्रे, गोपाल अत्तरकार, मेहुल जाधव, राजवीर श्रीनाथ, हिमांशू खत्री, विकास कुटे , नागेश राठोड, भागवत मानकर, महेश खानंदे, रुपेश सूर्यवंशी, सागर बाजड, निलेश उंबरकार, व पंकज सरकटे यांनी रक्तदान केले.

यावेळी आमदार अँड. आकाश फुंडकर, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया सहसंयोजक सागरदादा फुंडकर, भाजपा जिल्हा सचिव संजय शिनगारे, जिल्हा उपाध्यक्ष शरदचंद्र गायकी,डॉ. एकनाथ पाटील, तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ, शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, भाजयुमो शहराध्यक्ष राम मिश्रा, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड , शहराध्यक्ष शुभम देशमुख, माजी नप उपाध्यक्ष महेंद्र रोहनकार, ज्येष्ठ नेते महादेवराव कांबळे, माजी नगरसेवक गणेश सोनोने, राजेंद्र धनोकार, सतीशआप्पा दुडे,

सौ. शिवानी कुलकर्णी, सौ. भाग्यश्री मानकर, विलासराव देशमुख, राकेश राणा, विनोद टिकार, सुभाष इटणारे, वैभव डवरे, अशोक हट्टेल, दिलीप गुप्ता, अनिस जमादार, गणेश जाधव, शेखर कुलकर्णी, संतोष टाले, जितेंद्र पुरोहित, विजय उगले, गोपाल मानकर, सत्यनारायण थानवी, सोशल मीडिया जिल्हा संयोजक रोहन जयस्वाल, विजय महाले, युवराज मोरे, संतोष येवले, विक्की हट्टेल, प्रसाद एदलाबादकर, गोलू आळशी, राज टीकार, रुपेश खेकडे, अँड. दिनेश वाधवानी, मिथिलेश पांडे, हितेश पदमगिरीवार,

रमेश इंगळे, दिलज्योतसिंग संधू , आदित्य जोशी,कल्पेश बजाज, निकुंज मंदानी, पवन ठाकूर, संजू गुप्ता, श्री देशमुख, श्रीकांत जोशी, सोनू निभेवाणी, विनय पांडा शर्मा, यश आमले, विकास चौरे, विजू आनंदे, पवन शर्मा, विक्की चौधरी, आदित्य जोशी, अनिल मेतकर, अतुल माहुरकर, देवा गावंडे, डॉन राजेश शर्मा, डॉ.महेश आखरे, गजानन मुळीक, मंगेश सावरकर, पवन राठोड, प्रसन्न पिसे,

रोमित जवकार, रोशन गायकवाड, शेलार मामा,श्रीकांत टाले, संदीप राजपूत, संतोष गुरव, रवी गायगोल, पवन डिक्कर, गौरव माने , मनोज बानाईत , परितोष डवरे,आदी भाजप , भाजयुमो, विद्यार्थी आघाडी चे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: