पेंच व्याघ्र प्रकल्पात पहिलाच काळा बिबट…
रामटेक – राजु कापसे
रामटेक तालुक्यातील पवनी वनपरीक्षेत्रात असलेल्या मोगरकसा या संरक्षित जंगलात पर्यटकाला पर्यटकाला जंगल सफारीत काळया रंग असलेला बिबट पहिल्यांदाच बघायला मिळाला. रामटेक तालुक्यातील पवनी वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणारे मोगरकसा राखीव जंगल १६ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरले आहे.
हे मिश्र वनक्षेत्र असून यात सागवान, तेंदू, बांबू, सालई आणि अन्य प्रजातींची झाडे प्रचुर प्रमाणात आहेत. या सोबतच वाघ,बिबट्या, अस्वल, हरीण, सांबर, जंगली कुत्री आदी वन्य प्राण्यांचा देखिल या जंगलात वावर असुन या मध्ये आता पर्यटकांना काळा रंगाच्या बिबट देखील पहायला मिळणार असल्याने पर्यटकच्या ओढाही या मोगरकसा व्याघ्रप्रकल्पाकडे वाढणार आहे.
या वनक्षेत्रातील मोगरकसा तलावाशेजारी इको टुरिझम कॉम्प्लेक्स विकसित करण्याचे काम सुरु आहे. सालई ते बावनथडी या सुमारे ३० कि.मी.सफारी मार्गाचे नियोजन करण्यात आले आहे. मोगरकसा परिसर अनेक वर्षांपासून पर्यटनस्थळ म्हणून लोकांमध्ये चर्चेत असले तरी त्या जागेवर पर्यटनासाठी सोयी सुविधा उभारणीकडे मागील अनेक वर्षांपासून दुर्लक्ष झाले होते.
या भागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि स्थानिक नागरिकांना उत्पन्नाचे साधन निर्माण व्हावे यासाठी हा प्रकल्प विकसित करण्यात येत असल्याचे वनविभागाचे म्हणने होते.याठिकाणी पवनी-तुमसर या राज्य महामार्गावर सालई पासून जंगल सफारी सुरू करण्यासाठी सफारीचा प्रारंभ जून महिण्यापासून नव्या जंगल सफारीचा आनंद पर्यटक घेत आहेत.
१ कोटी ८० लक्ष रुपयांचा प्रकल्प
या प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन समितीने वनविभागाला आवश्यक कामांसाठी वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला आहे. स्थानीक आमदार व राज्य मंत्री ॲड आशिष जयस्वाल यांनी यासाठी सातत्याने पुढाकार तर घेतलाच, यासाठी पाठपुरावा केला व निधीची उपलब्धता करून दिली.
एकूण सहा एलिव्हेटेड विना वातानुकूलित तंबू तलावाच्या काठावर उभारल्या गेले आहेत. उभारलेले तंबू वातानुकूलित नाहीत परंतु भविष्यात ते वातानुकूलितमध्ये रुपांतरित करण्याची योजना आहे. हा प्रकल्प संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून चालविला जाणार आहे. तंबू सोबत डेक, पार्किंगचे क्षेत्र, लँडस्केपींग, उपाहारगृह, वॉच टॉवर, निसर्गमार्ग, सौर कुंपण या सुविधा उभारणार आहे.
पेंचवरील ताण कमी होणार
नागपूर वनविभागाच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे पेंच व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनावरील ताण कमी होणे हे देखील अपेक्षित आहे. सध्या पेंचवर पर्यटनाचा मोठ्या प्रमाणावर ताण आहे.
यामुळे बरेचदा पर्यटकांना निराश व्हावे लागते.मोगरकसा तलावालगतच्या इको टुरिझम काॅम्प्लेक्सच्या उभारणीमुळे पर्यटकांना नवा पर्याय उपलब्ध करणार असुन. त्यातून वन विभागाचे उत्पन्नही वाढायला सुरुवात झाली असुन.या जंगल सफारीची सुरुवात कधीपासून पर्यटकांमधे कमालीची उत्सुकता होती.