Wednesday, January 8, 2025
Homeराजकीयभाजयुमोने जाळला राहुल गांधीचा पुतळा...वीर सावरकर व संघावर केलेल्या वक्तव्याचा केला तीव्र...

भाजयुमोने जाळला राहुल गांधीचा पुतळा…वीर सावरकर व संघावर केलेल्या वक्तव्याचा केला तीव्र निषेध……

शरद नागदेवे, नागपूर

नागपूर -भारतीय जनता युवा मोर्चा नागपुर महानगरातर्फे शंकरनगर चौक येथे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचावर निषेध व्यक्त केला. राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्यानी वीर सावरकरांचा आपमान केला आहे, सातत्याने वीर सावरकरांचा अपमान करणार्‍या राहुल गांधींचा तीव्र निषेध आज भारतीय जनता युवा मोर्चा, नागपुर महानगरातर्फे व्यक्त करण्यात आला.

स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांकडून स्टायपेंड घ्यायचे, संघाने ब्रिटिशांना मदत केली अश्या प्रकारची अतिशय चुकीची टीका राहुल गांधी यांनी केली आहे. अश्या प्रकारे राहुल गांधी नेहमीच बरळत असतात. त्यांनी अश्या प्रकारचे चुकीचे वक्तव्य करणे त्वरित थांबवावे अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा येणार्या काळात यापेक्षा ही उग्र स्वरूपाचे आंदोलन करेल.

आजचे आंदोलन प्रमुख्याने भाजपा शहर अध्यक्ष आ. प्रविण दटके, भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे, भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले यांच्या मार्गदर्शनात झाले.

आंदोलनाचे नेतृत्व भाजयुमो शहर महामंत्री सचिन करारे, दिपांशु लिंगायत यांनी केले. यावेळी भाजयुमो प्रदेश सदस्य रितेश राहाटे, मंडळ अध्यक्ष निलेश राऊत, पंकज सोनकर, कमलेश पांडे, पुस्कर पोशट्टीवार, इशान जैन, उदय मिश्रा, संदीपन शुक्ला, आशिष तिवारी, स्वप्नील खडगी, रोहित फुलसुंगे, दिपेश यादव, वरुण गजबिये, अनिकेत ढोले, अजय मेश्राम, सौरव साहू, अकिलेश ठाकूर, पिंटू पटेल, गोविंदा काटेकर, हर्षल वाडेकर, अभिषेक नागपुरे, सचिन किराड, अमित कोठारी, मयूर तपासे, शंकर विश्वकर्मा प्रामुख्याने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: