Friday, October 18, 2024
HomeBreaking Newsजळगाव भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांचा शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश...भाजपने तिकीट नाकारल्याने...

जळगाव भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांचा शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश…भाजपने तिकीट नाकारल्याने घेतला शिवसेनेत प्रवेश…

जळगावचे भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी अखेर भाजपला सोडचिठ्ठी देत त्यांनी हाताला शिवबंधन बांधले. उन्मेष पाटील यांनी आज मातोश्री निवासस्थानी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून उन्मेष पाटील यांनी मशाल हाती घेतली. यावेळी पाटील यांच्या शेकडो समर्थकांनीही ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी मातोश्री परिसरात एकच जल्लोष करण्यात आला. उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने जळगावमध्ये भाजपला मोठं खिंडार पडलं आहे. तसेच सत्ताधारी भाजपच्या विद्यमान खासदाराने महाराष्ट्रात पक्षांतर करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

भाजपमध्ये नेत्याचं इनकमिंग सुरू असताना भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचे पाहायला मिळतंय. तिकीट कापल्यानं नाराज भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटाकडून लोकसभा लढणार असल्याची चर्चा आहे. इतकंच नाहीतर ते ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्याआधी मातोश्रीवर भेट घेऊन त्यांनी आपल्या लोकसभेचं तिकीटही निश्चित केल्याचे समजतंय. उन्मेष पाटील यांनी सामना कार्यालयात संजय राऊत यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीस गेले. उन्मेष पाटील यांनी आज दुपारी १२ वाजता उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. तर त्यांच्यासोबत पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार सुद्धा ठाकरे गटात प्रवेश केला आहे. २०१९ मध्ये उन्मेष पाटील हे तब्बल ४ लाख मतांनी विजयी झाले होते. मात्र यावेळी त्यांचं तिकीट भाजपने कापून विधानपरिषदेच्या माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. त्यामुळे ते नाराज असल्याचे सांगितले जातंय.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: