Monday, December 23, 2024
Homeराजकीयभाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी घेतले वसंतदादा पाटील यांच्या समाधी स्थळाचे दर्शन...

भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी घेतले वसंतदादा पाटील यांच्या समाधी स्थळाचे दर्शन…

सांगली – ज्योती मोरे

भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगली दौऱ्यात 13 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री पद्मभूषण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कृष्णाकाठावरील समाधीस्थळी दर्शन घेतले व त्यांना श्रद्धांजली वाहिली व अभिवादन केले.

श्री बावनकुळे हे मागील तीन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांचा संघटनात्मक सांगली जिल्हा दौरा होता. 13 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री पद्मभूषण वसंतदादा पाटील यांची 105 वी जयंती असल्यामुळे श्री बावनकुळे व त्यांच्यासमवेत भारतीय जनता पक्षाचे आमदार कामगारमंत्री व सांगलीचे पालकमंत्री श्री सुरेश भाऊ खाडे, खासदार श्री संजय काका पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री दीपक बाबा शिंदे भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्यासह सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी सांगलीच्या कृष्णा काठावरील समाधीचे दर्शन घेऊन वसंत दादा पाटील यांना श्रद्धांजली वाहिली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: