Monday, December 30, 2024
Homeराज्यआदिवासी गोंड गोवारी जमातीच्या आमरण उपोषणाला भाजपा प्रदेश अध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांची...

आदिवासी गोंड गोवारी जमातीच्या आमरण उपोषणाला भाजपा प्रदेश अध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट…

रामटेक – राजु कापसे

आदिवासी गोंड गोवारी जमातीचे किशोर चौधरी,सचिन चचाने,चंदन कोहरे २६जानेवारी पासून जमातीच्या मागणीकरीता उपोषणावर बसले आहेत. आज पंधराव्या दिवशी भाजपा प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट देऊन उपोषणकरत्याशी चर्चा केली.

उपोषणकरत्यांची मागणी संधर्भात आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोबत चर्चा करणार असल्याचे सांगितले.
उपोषण मंडपात कामठी – मौदा विधानसभा क्षेत्राचे आमदार टेकचंद सावरकर,रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी,भाजपा जिल्हा अध्यक्ष माजी आमदार सुधाकर कोहळे,माजी जिल्हा अध्यक्ष अरविंद गजभिये,

भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ.राजीव पोतदार,उमरेड विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुधीर पारवे,भाजपा जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष आशिष फुटाणे,भाजपा युवा नेते रोहित पारवे,भाजपा महिला आघाडी अध्यक्ष अनुराधा अमीन,

भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष योगेश वाडीभस्मे,मच्चीमार आघाडी जिल्हाध्यक्ष अमोल बावणे सह गोवारी समाजातील दादाराव बोटरे,अनिल राऊत,नंदकिशोर कोहळे,विनोद कोहळे,पांडुरंग वाघाडे,दामोधर नेवारे,भगवान भोंडे,ईश्वर गजबे,सुमित बोरजे, पुरुषत्तम राऊत सह गोंड गोवारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपोषणस्थळी उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: