Sunday, December 22, 2024
Homeकृषीशेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला भाजप प्रदेश सदस्य संदीप कोरेत यांची भेट...

शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला भाजप प्रदेश सदस्य संदीप कोरेत यांची भेट…

तुमच्या मागण्या भाजपा जिल्हाध्यक्ष मार्फत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री फडवनीस दरबारी पोहचविणार

अहेरी – आलापली ते आष्टी या राष्ट्रीय महामार्गावर लोहखनिजच्या जड वाहतूकीमुळे शेत पिकांवर धूळ बसल्याने मौजा बोरी, राजपूर प्याच, रामपूर चेक, शिवणी पाठ, ओदिगुडम, ग्राम पंचायत खमण चेरू, ग्राम पंचायत महागाव अंतर्गत येणारी रस्त्यावरील गावातली शेतीमधील कापुस पीक नुकसान मोठया प्रमाणावर झालेले आहे त्याचे सर्व्हे करण्यात आलेले आहे,

पण नुकसान भरपाई अजून पर्यंत मिळाली नाही म्हनून २/१/२३पासूनर८/१/२३साखळी उपोषण तहसील कार्यालय अहेरी येथे सुरु होते पण शासन व प्रशासन कडून कोणतेही मागण्या मान्य करण्यात आले नाही व कोणत्याही लोक प्रतिनिधी नी आमची भेट सुद्धा घेतली नाही त्यामूळे आता आमचा कोणीच वाली नाही असं समजून आम्ही सर्व पिडीत गावातील शेतकरी आता आमरण उपोषणाला १०/१/२३पासुन सुरु केले आहे.

त्या आमरण उपोषणाला प्रदेश सदस्य आदिवासी आघाडी महाराष्ट्र राज्य भाजपा युवा नेता संदीप भाऊ कोरेत यांनी भेट देऊन तुमची मागणी रास्त आहे तुमच्या समस्या आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष किशनजी नागदेवे याच्याशी उपोषण मंडपातून फोन करुन समस्या सगितली असता त्यांनी पालकमत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असे सागितले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: