Friday, December 27, 2024
HomeUncategorizedओबीसी समाजाचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींविरोधात भाजपाचे शनिवारी आंदोलन - भाजपा जिल्हाध्यक्ष...

ओबीसी समाजाचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींविरोधात भाजपाचे शनिवारी आंदोलन – भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांची घोषणा…

नांदेड – महेंद्र गायकवाड

मोदी या आडनावावरून ओबीसी समाजाचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी नांदेड महानगर तर्फे शनिवार दि.25 मार्च रोजी सकाळी 11 वा.मुथा चौक हनुमानपेठ नांदेड येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे भारतीय जनता पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

न्यायालयाच्या निर्णयाविरोधात भाष्य करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने कोणत्या कारणाबद्दल दोषी ठरवले आहे याबद्दल काहीच बोलत नसल्याबद्दल प्रवीण साले यांनी आश्चर्य व्यक्त केले. प्रवीण साले यांनी सांगितले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ”मोदी ” या आडनावावरून अपमानास्पद टिप्पण्णी करताना ओबीसी समाजाचा आणि या समाजाचा भाग असलेल्या तेली समाजबांधवांचा अपमान केला. न्यायालयाने या बद्दल राहुल गांधींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे.

राहुल गांधी हे आपल्या घराण्यामुळे आलेल्या राजेशाही मानसिकतेततून बाहेर पडले नाहीत असेच त्यांच्या वक्तव्यावरून दिसते. न्यायालयाने दिलेली शिक्षा मान्य करण्याच्या ऐवजी काँग्रेस नेते रस्त्यावर आंदोलने करून न्यायालयाचा व संविधानाचा अपमान करत आहेत. काँग्रेस नेत्यांनी न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल भाजपा न्यायालयात दाद मागेल, असेही ते म्हणाले.सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे काय असते , असे वक्तव्य राहुल गांधींनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील प्रचारसभेत बोलताना केले होते.

मोदी या आडनावाच्या अनेक व्यक्ती क्रीडापटू आहेत , डॉक्टर आहेत, इंजिनीअर आहेत, व्यावसायिक आहेत. एखाद्या आडनावाशी संबंधित लोकांचा एखादी व्यक्ती जाहीर सभेत अपमान करत असेल तर त्या विशिष्ट आडनावाच्या व्यक्तींना मानहानीचा दावा दाखल करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे.आपण कोणालाही अपमानित करावे हा आपला अधिकार आहे असे राहुल गांधींना वाटत असेल तर त्यांच्या वक्तव्यामुळे अपमानित झालेल्या व्यक्तीला त्याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे, असेही प्रवीण साले यांनी पत्रकात नमूद केले आहे.

न्यायालयाने दोषी ठरवल्या मुळे राहुल गांधी यांनी आपल्या खास्दार्कीचा राजीनामा द्यावा तसेच न्यायालयीन निकालाचा अनादर करून आंदोलन करणाऱ्या कॉंग्रेस जणाविरुद्ध कठोर कारवाई करावीयासाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनामध्ये भाजपा पदाधिकारी,लोकप्रतिनिधी,कार्यकर्ते तथा संविधानप्रेमी नागरिकांनी मोठ्या संखेने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांनी केले आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: