Monday, December 23, 2024
Homeराजकीयभाजप आमदार जयकुमार गोरे यांची गाडी ५० फूट खोल नदीत कोसळली...आमदार गंभीर...

भाजप आमदार जयकुमार गोरे यांची गाडी ५० फूट खोल नदीत कोसळली…आमदार गंभीर जखमी…

सातारा जिल्ह्यातील पुणे-पंढरपूर रस्त्यावरील मलठणजवळ आज पहाटेच्या सुमारास भाजप आमदार जयकुमार गोरे यांची कार ५० फूट खोल नदीत कोसळली. या अपघातात आमदाराची बरगडी फ्रॅक्चर झाली असून चालक आणि त्यांच्यासोबत असलेले दोन गार्ड गंभीर जखमी झाले आहेत. सर्वांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गोरेंबरोबरच गाडीमधील इतर दोघे किरकोळ जखमी आहेत. गंभीर जखमी असणाऱ्या दोघांना उपचारासाठी बारामतीला हलवण्यात आलं आहे. आमदार जयकुमार गोरे आणि त्यांचा सुरक्षारक्षक या अपघातात जखमी झाले आहेत. दोघांवरही फलटण येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज पहाटे ते मुंबईवरून त्यांच्या निवासस्थानी जात असताना हा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, गोरे यांची गाडी पुलाचा कठडा तोडून थेट खाली ५० फूट खोल नदीत कोसळली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार गोरे हे शुद्धीत असून ते किरकोळ जखमी झाले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: