Monday, December 23, 2024
Homeराजकीयभाजप अल्पसंख्यांक नेत्याच्या प्रयत्नामुळे कळंबोली मध्ये बेपत्ता मतीमंद मुलगी सुखरूप सापडली...

भाजप अल्पसंख्यांक नेत्याच्या प्रयत्नामुळे कळंबोली मध्ये बेपत्ता मतीमंद मुलगी सुखरूप सापडली…

पनवेल – किरण बाथम

खतीजा सिद्दीकी ही अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याने कळंबोलीमध्ये मोठी खळबळ माजली. परंतु सदर बाब भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांच्या पाठपुराव्या नंतर चार दिवसांनी सदर मुलगी सुखरूप सापडली. 

खतीजा ही पंधरा वर्षाची मतिमंद मुलगी. कळंबोली मधील कृष्णा टॉवरमध्ये कुटुंबासह राहते.सहावी पर्यंत व्यवस्थित जीवन जगलेली खतीजा अनपेक्षितपणे स्वतःचे मानसिक संतुलन हरवून बसली. कोरोनाकाळापासून सतत तीन वर्षात ती पूर्णतःमतिमंद बनली.

तीची आई फातिमा हिच्यासह ती बाजारहाटसाठी बाहेर निघाली.दुसऱ्या मजल्यावरून पहिल्या मजल्यावर येताच आईच्या हाताला भयानक ओरखाडे काढत तीने खाली धाव घेतली.तिची आई फातिमा पूर्णतः गांगरून गेली.पुन्हा दुसऱ्या मजल्यावर घरी नवऱ्याला घडला प्रकार सांगायला ती गेली.मात्र सगळे खाली येईपर्यंत खतीजा बेपत्ता झाली. सगळीकडे शोधाशोध आणी धावपळ सुरु झाली.संध्याकाळी शेवटी सगळ्यांनी कळंबोली पोलिसांत तक्रार दखल केली.परंतु पोलीस एका राजकीय नेत्याच्या तपासात असल्याने.

दोन दिवस काहीही खतीजा तपास कामात प्रगती नसल्याचे पाहून त्यांनी पत्रकार व भाजप नेते सय्यद अकबर यांच्याकडे धाव घेतली. सय्यद अकबर यांनी ताबडतोब वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या कानावर विषयाचे गांभीर्य विषद केले.

संजय पाटील यांनी त्वरित हालचाल सुरु केली.तिचा फोटो व नावासहित माहितीचे हॅन्डविल छापून विशेष पोलीस पथक नेमून तपासाला वेग दिला. खतीजाला मानसरोवर रेल्वे स्टेशनजवळ पहिल्याचे काहीजणांनी सांगितले.तशी तपासाची पोलिसांनी दिशा पकडली.तिच्या नातेवाईकांना दिलासा देण्यासाठी देखील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील व सय्यद अकबर यांनी मोठी मेहनत घेतली.खतीजाचे भाऊ, काका सर्व हितसंबंध असलेले.धावपळ करत होते.मतिमंद धड बोलता देखील न येणारी खतीजा सर्वांच्या चिंतेचा व प्रार्थनेचा विषय बनली.

शेवटी म्हणतात ना “देव तारी त्याला कोण मारी” असंच घडलं देखील.सिवूड दारावे परिसरात चौथ्या दिवशी एक महिला रिया अब्दुल कादिर नाडर यांच्या किचन डिलाईट हॉटेल सिवूड ईस्ट येथे त्यांना खतीजा दिसली.त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट पाहिली होती.त्यामुळे त्यांनी लगेचच फोनवर खतीजा सिवूडला असल्याचे पोलीस व नातेवाईकांना कळवले. पत्रकार इरफान शेख यांनी नेरूळ आणि तिथल्या व्हॉइट्सअप ग्रुपवर सर्व माहिती टाकल्याने हा प्रकार सर्वाना कळला होता. 

खतीजाच्या नातेवाईकांचा जीव अक्षरशःभांड्यात पडला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना देखील मतिमंद खतीजाला सुखरूप पाहून गलबळून आले. तिला पोलीस स्टेशनला आणल्यानंतर सर्वजण भावनाविवश झाले. खतीजाचे आजोबा आणि सर्वांनी सय्यद अकबर यांचे मनोमन जाहीर आभार मानले.वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील व सय्यद अकबर यांनी किचन डिलाईटच्या रिया नाडर कुटुंबाचे आभार मानले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: