मालेगावचे शिंदे गटाचे नेते व नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांचा करेक्ट कार्यक्रम उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने लावला असल्याचे बोलले जात आहे, कारण त्यांच्या तोडीचा भाजपचा मोठा नेता अद्वय हिरे यांचा आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला असून मालेगाव मध्ये शिवसेनेने ही मोठी खेळी केल्याचं म्हटलं जात आहे.
हिरे कुटुंबाचे राज्याच्या राजकारणात मोठं नाव आहे. ते माजी महसूल मंत्री सहकार महर्षी स्व. भाऊसाहेब हिरे यांचे ते पणतू आहेत. तर माजी परिवहन राज्यमंत्री प्रशांत हिरे यांचे ते पुत्र आहेत. आज मुंबईत शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत अद्वय हिरे यांचा जाहीरपणे पक्षप्रवेश करण्यात आला. यावेळी शेकडो शिवसैनिकांची उपस्थिती होती. शिवसेनेत प्रवेश करताच अद्वय हिरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अद्वय हिरे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 2009 साली स्व. गोपीनाथ मुंडे यांनी मला भाजपात लोकसभेत निवडून देण्याची विनंती केली. तेव्हापासून मी भाजपात काम करतोय.. भाजपात मी गेलो तेव्हा भाजपला सगळे सोडून जाण्याच्या तयारीत होते. तेव्हा राजकारणात सोनिया गांधी यांना पंतप्रधान करण्याची लाट होती. अशा परिस्थितीत अमृतभाई पटेल यांना पाडून आम्ही भाजपा भक्कम केल्याची आठवण अद्वय हिरे यांनी सांगितली…