मूर्तिजापूर विधानसभा विद्यमान आमदारांना तिकीट नाकारल्यानंतर शहरात नाट्यमय घडामोडी सुरू झाल्या आहेत. तर अशातच भाजपचे व विद्यमान आमदारांचे खास सहकारी असलेले कोमल तायडे हे भाजप सोडणार असल्याचे समजते तर त्यांनाही विधानसभा निवडणुकीत उतरायचं असल्याने विद्यमान आमदारांना तिकीट मिळाले नाही तर त्यांना मिळेल अशी आशा त्यांना होती. मात्र आता हे टिकीट रवी राठी यांना मिळणार असल्याने त्यांनी थेट मुंबई गाठत बच्चू कडू यांच्या पक्षात प्रवेश करून त्यांना मूर्तिजापूर विधानसभेची उमेदवारी मागणार आहेत. त्यांना जर उमेदवारी मिळाली तर या विधानसभेमध्ये वेगळ चित्र निर्माण होऊ शकते. कारण कोमल तायडे हे अनुसूचित जातीतील चांभार समाजाचे असल्यामुळे त्यांना त्यांच्या समाजातील पंधरा ते वीस हजार मत असल्याने ते त्यांच्याकडे ते वळवू शकतात. सोबतच छुप्या मार्गाने हरीश पिंपळे त्यांच्या पाठीशी असणार आहे .
कोमल तायडे हे 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवार होते मात्र त्यांना तिकीट न मिळाल्याने त्यांनी भाजपसोबत जाणे पसंत केले आणि विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांची ते खास बनले. ते गेल्या पाच वर्षापासून विद्यमान आमदार यांच्यासोबत राहुन मतदार संघातील भाजप कार्यकर्त्यांचा त्यांचा अगदी जवळचा परिचय आहे. मात्र हरीश पिंपळे यांना तिकीट नाकारल्याने नाराज होऊन ते प्रहार पक्षाची कास धरणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघाचे आता चित्र वेगळे असणार आहे.