Thursday, December 26, 2024
Homeराजकीय२ सप्टेंबरपासून भाजपा सशक्तिकरण अभियान बूथ दौरा...

२ सप्टेंबरपासून भाजपा सशक्तिकरण अभियान बूथ दौरा…

खा. प्रतापराव पाटील चिखलीकर करणार नांदेड उत्तर,बिलोली आणि लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघात दौरा…

महेंद्र गायकवाड
नांदेड

आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीला अधिक मजबूत आणि बळकट करण्याच्या अनुषंगाने सशक्तिकरण अभियान बूथ दौरा राबविण्यात येणार आहे. सशक्तिकरण अभियान बूथ दौरा खा. प्रतापराव पाटील चिखलीकर स्वतः करणारा असून बिलोली ,नांदेड उत्तर आणि लोहा – कंधार विधानसभा मतदारसंघातील अनेक बुथला भेटी देऊन त्या भागातील भाजपचे कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत .या दौऱ्याचा शुभारंभ 2 सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीची पुनर्बांधणी सुरू आहे .मागील निवडणुकीत ज्या बुथवर भाजपला मतदान कमी झाले त्या बुठवरील परिस्थिती जाणून घेण्यासाठी आणि त्या बुथच्या परिसरात भारतीय जनता पार्टीला अधिक बळकट करण्याच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाणार आहे. याशिवाय या बूथ परिसरात नागरिकांना कोणत्या सुविधा मिळाल्या नाहीत ? शासनाच्या कोणत्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत ? ज्या योजना पोहोचल्या नाहीत त्या योजना का पोहोचल्या नाहीत ? याची कारण मीमांसाकरणे ,संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून चर्चा करून पात्र लाभार्थ्यांना त्या योजनेचा लाभ तात्काळ मिळवून देणे आणि नागरिकांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनातील सक्षम आणि समृद्ध भारत निर्माण करण्याचे अनुषंगाने जनजागृती करण्यात येणार आहे . यासाठी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर हे स्वतः नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ, बिलोली आणि लोहा- कंधार विधानसभा मतदारसंघातील बूथ दौरा अभियानात जनता आणि भाजपा कार्यकर्ता यांच्याशी संवाद साधणार आहेत.

सशक्तिकरण अभियान बुथदौरा नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात दिनांक 2 सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता कोटीतीर्थ , सकाळी साडेनऊ वाजता नाळेश्वर, सकाळी साडेदहा वाजता राहाटी , सकाळी साडेअकरा वाजता सायाळ आणि दुपारी साडेबारा वाजता पिंपरी महिपाल येथे खा. चिखलीकर दौरा करणार आहेत. या दौऱ्यात खा. चिखलीकर यांच्या समवेत भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष प्रवीण साले , प्रदेश कार्यकारणी सदस्य मिलिंद देशमुख, भाजपा तालुका अध्यक्ष चे संतोष क्षीरसागर , युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अनिल पाटील बोरगावकर हे उपस्थित राहणार आहेत . दिनांक 3 सप्टेंबर रोजी बिलोली विधानसभा मतदारसंघातील दुगाव येथे सकाळी दहा वाजता, कवठा येथे सकाळी अकरा वाजता, पिंपळगाव येथे दुपारी बारा वाजता, हुनगुंदा येथे दुपारी दीड वाजता, बिलोली शहर येथे अडीच वाजता तर सायंकाळी पाच वाजता सावळी येथे दौरा होणार आहे.

खा. चिखलीकर यांच्या या दौऱ्यात भाजपाचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड, बिलोली तालुका अध्यक्ष श्रीनिवास नरवाडे, यादवराव तुडमे उपस्थित राहणार आहेत . लोहा – कंधार विधानसभा मतदारसंघातील सशक्तीकरण अभियान दौऱ्यात सकाळी दहा वाजता लाठ खुर्द, सकाळी अकरा वाजता मंगलसांगवी , दुपारी बारा वाजता नंदनवन, दुपारी एक वाजता औराळ, दुपारी दोन वाजता चिखली येथे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर भेट देणार आहेत. या दौऱ्यासोबत भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर, भाजपा तालुका अध्यक्ष भगवान राठोड हे उपस्थित राहणार आहेत. आयोजित करण्यात आलेल्या सशक्तीकरण अभियानात त्या त्या भागातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहतील अशी माहिती देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: