आज गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रिकॉर्ड ब्रेक निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी त्यांचे गृहराज्य गुजरातचे आभार मानले आणि सांगितले की विधानसभा निवडणुकीचे शानदार निकाल पाहून मी खूप भावूक झालो. त्यांच्या गृहराज्यात भाजपच्या विक्रमी विजयाबद्दल ते म्हणाले, “गुजरातचे आभार. निवडणुकीचे अभूतपूर्व निकाल पाहून मी खूप भावनांनी भारावून गेलो आहे. विकासाच्या राजकारणाला लोकांनी आशीर्वाद दिला आहे आणि ते अधिक वेगाने चालावे अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. मी गुजरातच्या जनशक्तीला नमन करतो.
त्यांनी आणखी एका ट्विटमध्ये लिहिले की, गुजरात भाजपच्या सर्व कष्टकरी कार्यकर्त्यांना मी सांगू इच्छितो की तुमच्यापैकी प्रत्येकजण चॅम्पियन आहे! आमच्या पक्षाची खरी ताकद असलेल्या आमच्या कार्यकर्त्यांच्या अतुलनीय परिश्रमाशिवाय हा ऐतिहासिक विजय शक्य झाला नसता.
आजच्या विजयाने भाजपने आपलाच 20 वर्षांचा विक्रम मोडला आहे. 2002 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 127 जागा जिंकल्या होत्या. याशिवाय काँग्रेसच्या सोलंकी सरकारचा ३७ वर्षांपूर्वीचा विक्रमही भाजपने मोडीत काढला आहे. 1985 मध्ये विधानसभा निवडणुकीत माधवसिंह सोलंकी सरकारने 149 जागा जिंकल्या होत्या.