BJP 2024 | आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी निवडणूक प्रभारी आणि सह-प्रभारी नियुक्त केले आहेत. विनोद तावडे यांची बिहारच्या निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विनोद तावडे यांच्यासह झारखंडचे माजी प्रदेशाध्यक्ष दीपक प्रकाश यांना बिहारचे सहप्रभारी बनवण्यात आले आहे. राष्ट्रीय सरचिटणीस दुष्यंत कुमार गौतम यांची पक्षाने उत्तराखंडचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. मात्र महाराष्ट्रात कोणाला नियुक्त करणार आहेत हे अजून स्पष्ट झाले नाही.
अमित मालवीय यांना बंगालचे सहप्रभारी केले
त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांना हरियाणाचे प्रभारी आणि सुरेंद्र नागर यांना त्यांच्यासोबत सहप्रभारी बनवण्यात आले आहे. बिहारचे माजी मंत्री मंगल पांडे यांच्याकडे पश्चिम बंगालची जबाबदारी देण्यात आली आहे. अमित मालवीय आणि आशा लाक्रा यांना बंगालचे सहप्रभारी बनवण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे आमदार महेंद्र सिंह यांच्याकडे मध्य प्रदेश निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. यंदाच्या एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तयारीला भाजपने अंतिम स्वरूप दिले आहे. या अंतर्गत पक्षाने आपले थीम साँग देखील रिलीज केले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाजप महिला आणि तरुणांवर लक्ष केंद्रित करत आहे. अशा परिस्थितीत पक्ष ७० वर्षांवरील नेत्यांची तिकिटे रद्द करू शकते. मात्र, या प्रकरणात नेत्यांची उंची लक्षात ठेवली जाईल. सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने गेल्या निवडणुकीत गमावलेल्या जागांवर लक्ष केंद्रित केले आहे.
भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष श्री @JPNadda ने आगामी लोकसभा चुनाव के लिए निम्नलिखित राज्यों में प्रदेश चुनाव प्रभारी एवं सह-चुनाव प्रभारी की नियुक्ति की है। pic.twitter.com/1hpPH4cNsa
— BJP (@BJP4India) January 27, 2024