सांगली – ज्योती मोरे
समाजसुधारिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. आमदार सुधीरदादा गाडगीळ व जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे यांनी समाजसेविका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. स्त्रियांच्या शैक्षणिक सामाजिक विकासासाठी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला.
एक आदर्श कन्या, एक आदर्श पत्नी, एक आदर्श शिक्षिका, एक आदर्श समाजसेविका अशा विविधांगांनी ज्यांचे व्यक्तिमत्त्व संपन्न होते अशा सावित्रीबाई फुले यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव आजही समाजावर पडलेला दिसतो. महिलांना शिक्षणासाठी प्रेरित करणाऱ्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज स्त्रिया शिक्षित झाल्या आहेत, त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिलांच्या हितासाठी व्यतीत केले आणि समाजातील कुप्रथा समूळ उखडून टाकल्या.
ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. सावित्रीबाई फुले जेव्हा मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जात असत, तेव्हा लोक त्यांच्यावर माती, शेण, दगड आणि मलमूत्र फेकत असत, परंतु त्या डगमगल्या नाहीत. सावित्रीबाई फुले हे स्त्री समाजाचे असे उदाहरण आहे,
ज्यांनी पुरुषप्रधान समाजाला हादरा दिला, पोकळ पाया दूर केला, समतेची अशी प्रतिमा मांडली, जिथे महिलांना केवळ सन्मान मिळाला नाही, तर जीवन जगण्याचा नवा मार्ग सापडला. त्यांच्यावर जे काही अत्याचार होत होते त्याविरुद्ध लढण्याचे धैर्य मिळाले. असे व्यक्तव्य आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शेखर इनामदार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नीता केळकर, प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार, अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सरचिटणीस मोहन व्हनखंडे, स्थायी सभापती धीरज सूर्यवंशी,
समाजकल्याण सभापती अनिता व्हनखंडे, नगरसेवक पांडुरंग कोरे, रणजीत सावर्डेकर, नगरसेविका कल्पना कोळेकर, अल्पसंख्याक प्रदेश सरचिटणीस अशरफ वांकर, युवा मोर्चा प्रदेश सचिव सागर व्हनखंडे, अविनाश मोहिते, उदय मुळे, दिगंबर जाधव, प्रियानंद कांबळे, गणपती साळुंखे, भालचंद साठे, निलेश निकम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.