एन. ई.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे पर्यवेक्षक मधुकर शंकर खरात सर यांनी स्वीकारले.
व्यासपीठावरील उपस्थित सर्व शिक्षक बंधुभागिणी नी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व सरस्वती माता यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मनोभावे पूजा केली. त्या वेळी काही मुलींनी पाळणा , काही ओव्या, कविता, नाटिका सादर केल्या.काही मुलांनी खूप छान भाषणेही केली.
साक्षी सोलनकर इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी हीने,” मी सावित्री बोलते ‘ या विषयावर एकपात्री नाटकाचा प्रयोग सादर केला. त्या वेळी जेष्ठ शिक्षक प्रमोद चव्हाण सर , , यांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा आदर्श घेतला पाहिजे असे मत व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव म्हणून आपण ही जयंती साजरी करत असतो. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालू ठेवावा असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री खरात सर यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अमोल सर यांनी केले.आयोजन सांस्कृतिक विभागाने केले.तर सुत्रसंचलन सौ.पर्वते मॅडम यांनी केले.