रामटेक – राजु कापसे
दिनांक 19/2/2024 रोज सोमवार तालुका शहरातील गांधी चौक येथे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती निमित्त नटराज कलावंत ग्रुप रामटेक, गुरुकुल बहुुद्देशिय संस्था रामटेक, छत्रपती बहुुद्देशिय संस्था, बेटी बचाव बेटी पढाव कराटे ग्रुप, परमात्मा एक सेवक संस्था दुधाळा आश्रम रामटेक, रामायण महानाट्य ग्रुप रामटेक, गायत्री परिवार रामटेक, आदित्य बहु. संस्था रामटेक व सर्व शिवप्रेमी यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित शिवजयंती महोत्सव 2024 व सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन राज्याचे माजी मंत्री मा.श्री. सुनिलजी केदार साहेब यांचा शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष रामटेक विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते श्री.चंद्रपाल चौकसे (अध्यक्ष, राष्ट्रीय पंचायती राज ग्रामप्रधान सरपंच संघटन महाराष्ट्र राज्य/पर्यटक मित्र रामटेक) व प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचा माजी अध्यक्षा सौ. रश्मिताई बर्वे (सदस्य जी.प. नागपुर) उपस्थित होते.
कार्यक्रमात शाहीर मंडळी, कलाकार मंडळी यांनी आपली कलाकृती सदर करून उपस्थितांची मन जिंकली. माजी मंत्री मा.श्री. सुनिलजी केदार साहेबांचा हस्ते विविध समाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचे व अमर शाहिद स्व. अक्षय भिलकर यांचे आई- वडील यांचे सत्कार करण्यात आले.
यावेळी डॉ. राजेश ठाकरे, आलोक मानकर, गोपी कोल्हेपरा, पिंटु भोयर सर्, नाना उराडे, संजय बोरकर, बबलु दुधबर्वे, नासिर शेख, राहुल कोठेकर, सुभाष नागपुरे, मोहन कोठेकर, अजय खेडगरकर, मारोती आत्रम सर, रामानंद अडामे, शोभाताई अडामे, अमीत कुकवास, संजय येनुरकर, श्रावण टेकाडे सर, कांचनमाला माकडे, वसंता दुंडे, समस्त शिवप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते