बिलोली – महेंद्र गायकवाड
बिलोली शहरातील नवीन बस स्थानकात 8 जानेवारी रोजी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास बिलोली ते देगलूर बस मध्ये चढताना एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र अज्ञात चोरट्यानी चोरले आहे.
मुखेड तालूक्यातील चोंडी हसनाळ येथील शांताबाई पिदके हि पन्नास वर्षीय महिला नवीन बसस्थानक येथून बिलोली -देगलूर बस मध्ये चढत असताना त्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची मनीमंगळसूत्र सात ग्राम किमतीचे पान असलेले पस्तीस हजार किमतीचे मंगळसूत्र कोणतीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले.
या प्रकरणी शांताबाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बिलोली पोलीस ठाण्यात गुरनं 06/2025 कलम 303(2)भारतीय न्याय संहिता -2023 कायदाप्रमाणे गुन्हा दखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मुद्देमवार हे करीत आहेत.