बिलोली – जे. महेश
बिलोली येथील अल ईम्रान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मोहसीन खान मुजीबपाशा यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विद्यापीठाच्या वतीने शारीरिक शिक्षण या विषयात पीएच.डी.ही शिक्षण क्षेञातील सर्वोच्च पदवी प्रदान करण्यात आली आहे.
त्यांनी डॉ.पि.एन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठानी महिला खेळाडूंच्या विकासाकरिता निर्धारित केलेल्या विविध खेळातील उपक्रमांच्या अंमलबजावणीच्या संदर्भात अभ्यास या विषयावर विद्यापीठास शोध प्रबंध सादर केला होता.
पीएच.डी पदवीच्या मौखीक परिक्षेसाठी विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखाचे अधिष्ठाता तथा चेअरमन डाॕ.सी.आर.बावीस्कर,बहिस्थ परिक्षक म्हणून डाॕ.तोरवी शिवसरन उपस्थित होते.मोहसीन खान यांना पीएच.डी.पदवी मिळाल्याबद्दल शिक्षणशास्ञ संकुलाचे संचालक डाॕ.सिंकुकुमार सिंह,बोर्ड आॕफ स्टडीजचे चेअरमन डाॕ.कैलास पाळणे,
डाॕ.गजमल, विद्यापीठाचे क्रिडा संचालक डाॕ.मनोज रेड्डी,डाॕ.भिमा केंगले,पानसरे महाविद्यालयाचे अध्यक्ष नागनाथ पाटील सावळीकर,सचिव सुनील बेजगमवार,संचालक प्रकाश पाटील अर्जुने,प्राचार्य डाॕ.अलीमोद्दीन, कार्यालयीन अधिक्षक राजु लापशेटवार,क्रिडा संचालक डाॕ.महेश वाकरडकर महाविद्यालयाचे सर्व वरिष्ठ व कनिष्ठ प्राध्यापक वृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी, शासकिय अधिकारी,कर्मचारी,पञकार आदींनी सर्वांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.