Sunday, November 17, 2024
Homeराज्यबिलोली पोलीसांनी चोरीचा गुन्हा उघड करून आरोपीस केले गजाआड…

बिलोली पोलीसांनी चोरीचा गुन्हा उघड करून आरोपीस केले गजाआड…

नांदेड – महेंद्र गायकवाड

बिलोली शहरातील एका महिलेने बचत गटाकडून उचललेले साठ हजार रुपये आपल्या मुलाकडे दिले असता त्यांनी ते पैसे स्कुटीच्या डिक्कीत ठेवले. त्यानंतर डिक्कीतून पैसे चोरीला गेले.मुलाच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणी पोलिसांनी शहरातील एका तरुणांस ताब्यात घेतले असून त्याच्याकडील रोख रक्कम हस्तगत केली आहे.बिलोली पोलिसांच्या चांगल्या कामगिरीबदल त्यांचे कौतुक होत आहे.

बिलोली शहरात नऊ दिवसापुर्वी घडलेल्या चोरीचा गुन्हा उघड करून आरोपीस अटक करून गुन्हयातील गेलेला माल हस्तगत करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी बिलोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले बिलोली यांना दिले होते. सविस्तर वृत्त असे की, यातील फिर्यादी अली अब्दुल रशीद चाऊस, वय 28 वर्षे, व्यवसाय किराणा दुकान रा. छोटी गल्ली बिलोली यांनी दिनांक 27 जुलै रोजी रात्री 21.30 वा. चे सुमारास तक्रार दिली की माझा आईने महिला बचत गटाचे उचलुन आणलेले साठ हजार रूपये घराकडे जाऊन ठेवण्यासाठी दिले होते.

ते पैसे अब्दुल रशीद चाऊस यांनी त्यांच्या दुकानासमोरील स्कुटीच्या डिकीत ठेवुन किराणा दुकान बंद करून परत घरी जाण्यासाठी निघाले असता डिकीतील 60,000/- रूपये हे कोणतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली होती.त्यांच्या फिर्यादी वरून पोस्टे बिलोली गुरन 174/2024 कलम 303 (2) भा.न्या.सं-2023 कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास कामी पोहेकों 2351 मारोती मुददेमवार यांचेकडे दिला.

सदर गुन्हा उघडकीस आणण्याकरीता तेथील पोलीस अधीकारी व पोलीस अंमलदार यांनी आरोपीचा शोध घेत असतांना संशयीत आरोपी नामे शेख इम्रान शेख सलीम, वय 21 वर्षे, व्यवसाय मजुरी रा. इदगाह गल्ली बिलोली यास ताब्यात घेवुन व विश्वासात घेऊन विचारपुस केली असता सदरचा गुन्हा मीच केला असुन गुन्हयातील चोरलेली रक्कम साठ हजार रूपये पंचासमक्ष काढुन दिली आहे. अशा प्रकारे बिलोली पोलीसांनी गुन्हा उघडकीस आणुन चांगल कामगीरी केली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे,अपर पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार, खंडेराय धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, हानपुडे पाटील, उपविभागीय पोलीस अधीकारी बिलोली, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अतुल भोसले, सपोनि शिंदे, पोउपनि दिलीप मुंडे, पोहेकॉ एम एस मुददेमवार, पोकॉ व्यंकट घोंगडे, यांनी अथक परिश्रम घेऊन चांगली कामगीरी केल्याबद्दल वरिष्ठांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: