Bill Gates & Melinda : अमेरिका आणि ब्रिटनच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. तुरुंगात आत्महत्या केल्यानंतर दोषी अब्जाधीश जेफ्री एपस्टाईनच्या चौकशीदरम्यान विचारण्यात आलेली यादी आणि प्रश्न सार्वजनिक करण्यात आले आहेत. या यादीत प्रिन्स अँड्र्यू, बिल क्लिंटन आणि मायकेल जॅक्सनसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. दरम्यान, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांची माजी पत्नी मेलिंडाचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने गेट्सपासून घटस्फोट घेण्याचे कारण एपस्टाईनला सांगितले होते.
बिल गेट्सचे एपस्टाईनशी संबंध होते का?
बिल गेट्सच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, गेट्स यांनी लैंगिक अपराधी जेफ्री एपस्टाईन यांची सार्वजनिक हिताच्या विषयावर भेट घेतली होती. 2011 पासून तो एपस्टाईनला अनेकदा भेटले होते. मिळालेल्या माहितीनुसार, गेट्स एपस्टाईनला त्याच्या मॅनहॅटन टाउनहाऊसमध्ये तीन वेळा भेटले. एकदा तर टे रात्री उशिरापर्यंत सोबत राहिले. त्याच्यासोबत गेट्स फाऊंडेशनच्या कर्मचाऱ्यांनीही एपस्टाईनला त्याच्या घरी अनेकदा भेट दिली.
वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार, एपस्टाईनने गेट्सला रशियन ब्रिज प्लेयर मिला अँटोनोव्हासोबत अफेअर असल्याबद्दल गेट्सला धमकी दिली होती. त्यावेळी गेट्सचा विवाह मेलिंडाशी झाला होता. तथापि, नंतर गेट्सने एका मुलाखतीत कबूल केले की त्यांनी एपस्टाईनसोबत डिनर करणे महागात पडले.
मेलिंडा काय म्हणाली?
मेलिंडा यांनी सीबीसी मॉर्निंग्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, बिल गेट्ससोबत घटस्फोट घेण्यामागे कोणतेही विशिष्ट कारण नव्हते, परंतु गेट्ससोबतचे आमचे नाते स्वस्थ नसल्याचे मला जाणवले. मेलिंडाने कबूल केले की तिला एपस्टाईनसोबत गेट्सच्या भेटी आवडल्या नाहीत. याबाबत मी त्याला स्पष्ट केले. मेलिंडाने एपस्टाईनला वाईट व्यक्ती म्हटले.
🚨Epstein Client List
— Concerned Citizen (@BGatesIsaPyscho) January 4, 2024
This is Bill Gates wife Melinda Gates talking about her ex-husbands relationship with child sex trafficker Jeffrey Epstein citing it as being part of the reason for their divorce.
It’s well known Bill Gates featured on the Lolita Express 37 times, yet… pic.twitter.com/iOUhxCMnWl