Sunday, December 22, 2024
Homeराज्यकारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यु...रामटेक - तुमसर मार्गावर अंबाळा वळणाजवळची घटना...

कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यु…रामटेक – तुमसर मार्गावर अंबाळा वळणाजवळची घटना…

रामटेक – राजू कापसे

रामटेक – तुमसर मार्गावर रामटेक कडुन खिंडसीकडे जात असलेल्या ४७ वर्षीय इसमास मागुन येणार्‍या अनियंत्रीत कार ने जबर धडक दिल्याने इसमाचा मृत्यु झाल्याची घटना आज दि.५ नोव्हेंबर ला सकाळी ११ ते ११.३० वाजतादरम्यान अंबाळा वळणाजवळ घडली.
आनंद जनार्दन जगताप वय ४७ रा. वॉटर सप्लाय कॉर्टर नवरगाव असे मृतकाचे नाव आहे.

तो नगर परिषदेच्या पाणिपुरवठा विभागांतर्गत कार्यरत होता. आज दि. ५ नोव्हेंबर ला आनंद ला रामटेक कडुन खिंडसीकडे जायचे होते मात्र त्याची दुचाकी नादुरुस्त असल्याकारणाने त्याने मित्राची दुचाकी घेतली व खिंडसी मार्गाने निघाला. दरम्यान अंबाळा वळना जवळ त्याची दुचाकी येताच मागुन एम.एच.३१ पी.आर.

८८६७ क्रमांकाच्या कार ने दुचाकीला जबर धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की दुचाकी अक्षरशः कार च्या समोरील भागाखाली फसून गेलेली होती. आनंद च्या मागे आई, वडील, पत्नी, दोन मुले एक पाचव्या वर्गात तर एक तिसऱ्या वर्गात आहेत. पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहे.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: