Monday, December 23, 2024
HomeSocial Trendingपाण्यात तरंगणारे नोटांचे बंडले पाहून लोकांनी मारल्या कालव्यात उड्या!…पाहा Viral Video

पाण्यात तरंगणारे नोटांचे बंडले पाहून लोकांनी मारल्या कालव्यात उड्या!…पाहा Viral Video

Viral Video : सोशल मिडीयावर एक Video सध्या धुमाकूळ घालत आहे. बिहारच्या सासाराम जिल्ह्यात हा video असल्याचे समोर आले आहे. या Video मध्ये नोटांची बंडले कथितपणे कालव्यात तरंगताना आढळून आली, ज्यांना लुटण्यासाठी लोकांनी कालव्यात उड्या मारल्या, यामध्ये अनेकांच्या हातात भिजलेली नोटांची बंडले बघायला मिळाली.

हे प्रकरण पाटण्यापासून 150 किमी अंतरावर असलेल्या सासारामचे आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे, कालव्यातून अचानक नोटांचे बंडल कसे बाहेर येऊ लागले, ही बातमी संपूर्ण परिसरात आगीसारखी पसरली, मग काय होते ज्याने ही बातमी ऐकली त्याने आव देखा ना ताव…सरळ कालव्यात मारली उडी. व्हिडिओमध्ये लोक नोटांचे बंडल उचलतानाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

काही जण एका हाताने तर काही दोन्ही हातांनी नोटांचे बंडल उचलण्यात मग्न असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याच वेळी, हा व्हिडिओ खरा असल्याची पुष्टी केली जात नाही किंवा नोटांचे बंडलही खरे असल्याची पुष्टी केली जात नाही. दुसरीकडे, ते खरे की बनावट याचा तपास पोलीस करत आहेत. असे सांगितले जात आहे की एका व्यक्तीने प्रथम नोटांचे बंडले अशा प्रकारे कालव्यात तरंगताना पाहिले, त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: